शिराळा: पावलेवाडी ( ता.शिराळा ) येथील गणेश कृष्णा पावले ( वय १७) याचा शेतात जात असता विजेच्या खांबाचा शॉक बसून मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दि.२७ रोजी दुपारी चार च्या दरम्यान घडली. याबाबत माहिती अशी की , गणेश पावले हा शेतामध्ये निघाला असता बांधावर असणाऱ्या वीज वितरण कंपनी च्या खांबाला शॉक लागून त्याचा जागेवरच मृत्यू झाला.याबाबत शिवाजी पावले यांनी शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली असून तपास हवालदार शिवाजी पाटील हे करीत आहेत.तो इयत्ता १२ वी मध्ये शिकत होता. त्याच्या पश्चात आई,वडील,दोन बहिणी ,भाऊ,चुलते, चुलती असा परिवार आहे.
1 Comments
Nice peace
ReplyDelete