BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पावसाची उघडीप; तरी ही वारणा पात्राबाहेर


 शिराळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कमी आल्याने चांदोली धरणातून सांडवा व विद्युत निर्मिती असा ८७२० कुसेक्सने विसर्ग सुरू आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत घट होऊ लागली असली तरी वारणेचे पाणी पात्रा बाहेर असल्याने शित्तुर-आरळा, चरण-सोंडोली, भेडसगाव-बिळाशी,कांदे-मांगले हे चार पूल व कोकरूड-रेठरे,शिराळे खुर्द-माणगांव, मांगले-सावर्डे हे तीन बंधारे पाण्याखाली आहेत. पावसाची उघडीप असल्याने सोनवडे,आरळा, चरण, या रस्त्यावर आलेले पाणी कमी झाले असल्याने शिराळा ते चांदोली ही वाहतूक सुरू झाली आहे.वारणा काठची पिके अद्याप पाण्याखाली आहेत.

धरण परिसरात २४ तासात ८६ तर आठ तासात १६ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. धरणात ३१.२६ टी. एम.सी. म्हणजे ९०.८५ टक्के पाणीसाठा आहे. शनिवारी सकाळी आठ ते रविवारी सकाळी आठ या २४ तासात ८६ मी.मी.तर रविवारी सकाळी आठ सायंकाळी चार पर्यंत १६ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.

Post a Comment

0 Comments