शिराळा: शिराळा तालुक्यात दुपार पासून पावसाचा जोर वाढला असून २४ तासात ६८ मी.मी. पावसाची नोंद झाल्याने चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी झाली आहे.
गेले तीन दिवसांपासून तालुक्यात पावसाने सुरवात केली आहे.मात्र आज दुपार पासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे.
सायंकाळी चार धरणाच्या पाण्याची पातळी ६१८ मीटर असून धरण २६.४० टी. एम.सी. पाणीसाठा झाला आहे. २४ तासात ६८ तर सकाळी आठ ते सायंकाळी ४ आठ तासात २२ असा एकूण ८५५ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. धरणात १२२४२ कुसेक्सने पाण्याची आवक होत आहे. १११५ कुसेक्सने पाणी वारणा नदीत सोडले जात आहे.
0 Comments