BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रेड येथील दीपक पाटील यांचा अपघातात मृत्यू

 


 शिराळा , ता .३ : रेड ( ता.शिराळा ) येथील दिपक आनंदा पाटील ( वय ३८ ) या युवकाचा ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन मृत्यू झाला . ट्रक चालक देवेंद्र माताप्पा शिंगणे रा . विनायकनगर , सांगली याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे . 

याबाबत जयसिंग राजाराम पाटील यांनी शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.ही घटना सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली . याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी , दिपक हे त्यांच्या हिरो होन्डा शाईन ( एम एच -१० बी.यु .७७८८ ) या दुचाकीवरून पेठ नाका येथे जात असताना रेड गावच्या हद्दीतील मरळे वस्तीजवळ समोरून आलेल्या ट्रकला , ( एम.एच .१० झेड १३२७ ) धडकून गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाला . निष्काळजीपणाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्यामुळे अपघात घडला आहे.असा आरोप चालकवर ठेवण्यात आला आहे.चौकशीसाठी ट्रक चालकाला ट्रकसहित ताब्यात घेतले आहे . त्याच्या पश्चात आई , वडील पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे . पुढील तपास पोलीस हवालदार बी.जी. कुंभार करत आहेत .

Post a Comment

0 Comments