BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आषाढी एकादशीला गोरक्षनाथांचे बाहेरूनच दर्शन

 


शिराळा,ता.२०:  प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील गोरक्षनाथांची आषाढी एकादशीला भरणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर

 सलग दुसऱ्या वर्षी रद्द करावी लागली. मंदिर प्रवेश बंद असल्याने या मार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांनी पावसाच्या हलक्या सरी अंगावर झेलत रस्त्यावरुन   गोरक्षनाथांचे दर्शन घेतले.

 शिराळा येथे गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी सांगली,सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो भाविक  ऊन पावसाची तमा न बाळगता येतात. मात्र सलग दुसऱ्या वर्षी  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.  आज आषाढी  एकादशी असली तरी ती ही यात्रा रद्द केली आहे. त्यामुळे गोरक्षनाथ मंदिर परिसरात शुकशुकाट जाणत होता.ज्या लोकांना पंढरपूरला जाता येत नाही ते लोक प्रति पंढरपूर म्हणून गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी येतात असतात.

मठाधिपती पीर पारसनाथ महाराज, आनंदनाथ महाराज यांनी विधिवत पूजा व आरती केली. मंदिरात अखंड ओम नमो शिवाय हा जप सुरू आहे.

आज आषाडी एकादशी असल्याने लोकांची मंदिरात गर्दी होऊ नये म्हणून शिराळा पोलिसांनी मंदिर परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता.  त्यामुळे हजारो लोकांच्या दिंड्या,पालख्या मुळे गाजबजणारे नाथांचे पटांगण मात्र,टाळ, मृदुंग, विठू माऊलीच्या गजराविना ओस पडले होते.

Post a Comment

0 Comments