मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे १३ फुट मगरीला पकडून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.
पुराच्या पाण्यातून आलेली ही मगर पाणी ओसरताच कवठेपिरान-कारंदवाडी रस्त्याच्या दरम्यान एका विहिरीत होती. पुराचे पाणी कमी झाल्याने संध्याकाळी ती विहिरीतून सोयाबीनच्या शेतात बाहेर आली. मगर शेतात वस्तीला असलेल्या शेतकर्यांना दिसली. त्यांनी ही माहिती गावांतील लोकांना व वनविभागाला सांगितली. उदय सुतार, संकेत पाटील, तानाजी शिंदे, युवराज पाटील, संभाजी शिंदे, कृष्णात पाटील, आण्णा पाटील या गावच्या धाडसी युवकांनी तीला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले.
या भागात आणखी मगर असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकर्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments