शिराळा (प्रतिनिधी) : वाकुर्डे बुद्रुक योजनेची कामे तसेच पूर्ण झालेला गिरजवडे प्रकल्पासह उत्तर भागातील अनेक कामे मार्गी लावण्याचे काम माझ्या हातून झाले याचे समाधान आहे. नजीकच्या काळात वाकुर्डे योजनेची उर्वरित कामे झपाट्याने पूर्ण करून शिराळा, वाळवा तालुक्याला पाणी देणे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
घागरेवाडी (ता. शिराळा) येथील भाजपच्या सरपंच उषा अशोक घागरे, उपसरपंच लक्ष्मी दगडू घागरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. माजी सभापती, सदस्य सम्राटसिंग नाईक, विलास घागरे, अशोक घागरे, सर्जेराव, संतोष घागरे, अनंत सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार नाईक म्हणाले, घागरेवाडी गावातील भाजप सर्व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर तेथे विरोध शिल्लक राहिला नाही. ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता प्रस्थापित झाली आहे. उत्तर भागाच्या विकासासाठी मी नेहमी प्रयत्न केले आहेत. पुढील काळात आपणांस अनेक विकास कामे मार्गी लावायची आहेत. जुन्या व नवीन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी एकजिनसीपणाने समाजहिताची कामे करावीत.
प्रारंभी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत झाले. सर्वांना पक्षप्रवेश देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवेश केलेले इतर कार्यकर्ते असे : ग्रामपंचायत सदस्य मारुती धोंडी घागरे, मनीषा दिनकर चौगुले, मनीषा गणपती लोहार, वैजंता कृष्णराव खोबरे व जगन्नाथ पांडुरंग ढवळे, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव हरिबा घागरे, माजी सरपंच तानाजी विठ्ठल खोचरे, माजी सदस्य रंजना बाळासो घागरे, सुजाता दत्तात्रय खोचरे, श्रीमती अक्काताई बाबुराव घागरे, रेश्मा अशोक घागरे, विठ्ठल रुक्मिणी देवी मंडळाचे अध्यक्ष मारुती गणपती घागरे, उपाध्यक्ष दीपक बाळा घागरे, सरचिटणीस शिवाजी अण्णा खोचरे, उद्योजक बापू कृष्णा लोहार, बाळू किसन देवाळे, सेवानिवृत्त कॅप्टन दत्तात्रय नाना खोचरे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव दाजी घागरे अर्जुन रमेश घागरे सुभाष विष्णू खोचरे, दिपक विठ्ठल घागरे, आनंदा तुकाराम खोचरे, अशोक चौगुले, साहिल व बाळासो सूर्यवंशी, दीपक व संदेश ढवळे, रुपेश, वसंत, कृष्णराव, बाजीराव खोचरे, चंद्रकांत, शामराव, मारुती, शिवाजी, संजय, संतोष, कृष्णा, पोपट, गुंडा, प्रतीक घागरे, दीपक व संदेश ढवळे आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
0 Comments