शिराळा,ता.१: सुदृढ आरोग्यासाठी सेंद्रिय शेती महत्वाची असल्याने याकडे लोकांचा कल हळूहळू वाढू लागला असून याबाबत ग्रामीण भागात जनजागृती करणे करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले.
येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या सेंद्रीय उत्पादन व विक्रीचे बाबतच्या अंबामाता कृषी मार्गदर्शन व सुविधा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.तालुका कृषी अधिकारी गणपती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुका कृषी अधिकारी गणपती पाटील म्हणाले,लाकांची दिवसेंदिवस सेंद्रीय शेतीपुरक अन्नाधान्य व भाजीपाला याकडे कल वाढला आहे.शिराळासारख्या डोंगरी दुर्गम तालुक्यात सेंद्रीय शेतीच्या उत्पादनाचे सुरू झालेले दालन हे सर्वांना उपयुक्त ठरेल. यावेळी यशवंत दूध संघाचे कार्यकारी संचालक सत्यजीत नाईक,बालविकास अधिकारी सतीश नवले, पर्यवेक्षिका शकुंतला निकम,जयसिंगराव शिंदे,नगरसेवक केदार नलवडे, गजानन पाटील, मारुती दिंडे,अशोक लोहार, संजय घोडे-पाटील, दिग्विजय पाटील,अवधूत गायकवाड,प्रतीक साळुंखे, शिवम शेटे,सूरज गायकवाड, आकाश पाटील, शिवाजीराव चौगुले, दिनेश हसबनीस, राजू पाटील,ओंकार पाटील, अनिकेत मगदुम,ऋषीकेश पाटील,संकल्प लोहार,मुख्याध्यापक संजय पाटील, अजित महाजन,सौ.सरला घोडे-पाटील उपस्थित होते.
0 Comments