BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दोन हजार लाच प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस फौजदर लाचलुचप प्रतिबंधकच्या जाळयात

 


शिराळा,ता.६ जुलै(मंगळवार) :येथील पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार कुमार काका वायदंडे (वय ५५) यांना फिर्यादीच्या भावाच्या विरोधातील गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.  

या बाबत समजलेली माहिती अशी, तक्रारदाराच्या भावाच्या विरोधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी वायदंडे यांनी २ ते ३ हजार रुपये लागतील असे सांगितले होते.  याबाबत तक्रारदाराने आज सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पडताळणी  केली असता वायदंडे यांनी २ हजार रुपये लाच मागितल्याने निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस ठाण्याच्या सापळा लावण्यात आला.त्यानुसार तक्रारदाराला पैसे घेऊन पाठवण्यात आले. हे पैसे घेताना वायदंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रंगेहाथ पकडले. 

     ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुजय घाडगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे,प्रशांत चौगुले,  संजय कलकुटगी, अविनाश सागर, प्रितम चौगुले, रवींद्र धुमाळ, सलीम मकानदार, सीमा माने, राधिका माने,अजित पाटील, चालक बाळासाहेब पवार यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments