BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळच्या मातीतून जन्माला आलेली कलाकृती झ्या...

 

शिराळा, ता.१३: येथील लेखक,दिग्दर्शक,अभिनेते दिपक यांच्या  सरदार हरबा फिल्मस निर्मित  "झ्या"-एक पारंपारीक वेदनेचा जोखड" या लघुपटाचा प्रिमियर शो विश्वासराव नाईक महाविद्यालयात  आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी सांगली जिल्हापरिषदचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख,सांगली, माजी सभापती रविंद्र बर्डे,सत्यजित नाईक,नगरसेवक विश्वप्रतापसिंह नाईक,माजी सभापती सुवर्णा जाधव, नगराध्यक्षा सुनिता निकम,माजी नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, प्रमोद सुकरे, बालीश थोरात,रंगराव घागरे,पिंटु पाटील,गणेश सावंत,,गजानन सोनटक्के,राजेंद्र निकम,बंटी पाटील,गजानन पाटील,कृष्णा नलवडे,विनय हसबनीस,अमर भोरे,बाळासो गोसावी,उत्कर्ष पवार  उपस्थित होते.

आजच्या आधुनिक युगातही देशात गाढवांबरोबर आपले गाढवमय शोषीत जिवन जगत असणा-या लोकांच्या जिवनमानावर मनाला झोंबुन जाणारे भाष्य झ्या लघुपटाच्या माध्यामातुन या चित्रपटाचे लेखक,दिग्दर्शक दिपक पवार यानी प्रभावीपणे केला आहे.हा चित्रपट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार पटकावुन शिराळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवेल

आमदार मानसिंगराव नाईक

कालीदास जन्माष्टमीच्या शुभ मुहुर्तावर प्रिमिसर शो झालेल्या दिपक पवार यांच्या झ्या चित्रपट सर्व बाजुनी गाढवांच्या जिवावर जगणा-या उपेक्षीत लोकांचे जगणे मनाला अस्वस्थ करुन जाण्यात यशस्वी ठरला आहे.हा चित्रपट लवकरच अनेक पुरस्कारावर आपले नांव कोरुन शिराळ्याच्या लौकीकात भर घालेल.

                                              सत्यजित देशमुख

दीपक पवारांनी आजही घुसमटीचे गाढवमय जिवन जगत असलेल्या उपेक्षीत लोकांवर दृष्टीक्षेप टाकणा-या आव्हानात्मक विषयावर चित्रपट बनववला. याची कथा,कलाकारांचा अभिनय,मनाला भिडणारे संवाद,कथेला साजेशी उत्तम लोकेशन्स या गोष्टींचा उत्तम ताळमेळ घालुन लघुपटाचे प्रभावी सादरीकरण केले आहे.हा चित्रपट येणा-या दिवसात अनेक पुरस्कार पटकावेल.

                                                     रविद्र बर्डे


 

Post a Comment

0 Comments