शिराळा,ता.८: येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात अमित विश्वास घेवदे (वय १७) या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना आज सायंकाळी सव्वा पाच वाजणेपूर्वी घडली. याबाबत पोलिसातुन समजलेली माहिती अशी घेवदे यांचे बाजार समिती आवारात कार्यालय आहे. त्या ठिकाणी अमितने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत निवास महादेव घेवदे रा..औंढी यांनी शिराळा पोलिसात वर्दी दिली आहे. अधिक तपास पोलिस हवलदार बी.जी. कुंभार करीत आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
0 Comments