BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

10 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – 2021


 सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – 2021 दिनांक 10 ऑक्टोंबर 2021 रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिली आहे. 

इयत्ता 1 ली ते 5 वी व  इ 6 वी ते 8 वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इतयादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक पदावरी नियुक्तीसाठी उमेदवारांनी प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होण अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुक्ल भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील देण्यात आला आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 03 ते 25 ऑगस्ट 2021 अखेरपर्यंत आहे. 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – 2021 वेळापत्रक पुढीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी दिनांक 03 ते 25 ऑगस्ट 2021, प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे- 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर 2021 शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – 1 दिनांक 10 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 10.30 ते 1 वा पर्यंत,  शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – 1 दिनांक 10 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 2 ते 4.30 वा पर्यंत असा आहे.

Post a Comment

0 Comments