BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चक्री वादळाचा शिराळा एम.आय.डी.सी.ला फटका तर अनेक ठिकाणी ढगफुटी

 



 

शिराळा,ता.५: येथील औद्योगीक वसाहत येथे चक्री वादळी वा-्यामुळे अनेक कंपनींचे पत्रे उडुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन भिंत पडल्याने  पाच चार महिला पत्रा लागून भटवाडी येथे एक अशा एकूण पाच महिला तर नितीन पाटील वारणानगर व रोहित माळी खेड हे किरकोळ जखमी झाले आहेत, भटवाडी येथे आठ ते दहा घरांचे नुकसान झाले आहे. शिराळा उत्तर भागात ढगफुटी झाल्याने ओढ्याचे पाणी अनेक घरात घुसले आहे. एम.आय.डी.सी.त लाखोंचे नुकसान झाले असून अधिकृत आकडा उद्या समजेल.



  मितल महादेव डांगे (वय २३ रा. शिराळा युवतीचे पायवर भिंत पडल्याने दोन्ही पाय मोडले आहे.तर डोक्याला मार लागला आहे. भीत पडल्याने मेघा लक्ष्मण पाटील (वय २३).रा .थावडे शाहूवाडी गंभीर जखमी आहेत. इको राईज बायोफर्टीलायझर  कंपनी भित पडली व छत उडाले. या मध्ये काम करणाऱ्या तीन मुली व एक महिला जखमी झाले आहेत. यात सविता बाजीराव निकम (वय ४०), स्नेहल आनंदराव मस्के (वय २३)यांच्या  डोक्याला मार लागला आहे. जखमींवर शिराळा येथील यादव ह मध्ये उपचार करण्यात आले. वादळामुळे एज कंपनीचे पत्रे उडाले मुळे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. .भटवाडी येथे घरांचे मोठे नुकसान झाले आहे.घराचा पत्रा लागल्याने अर्चना महादेव चव्हाण जखमी झाल्या आहेत .येथीव प्रकाश विश्वास चव्हाण, विकास विश्वास चव्हाण, दिपक विश्वास चव्हाण ,सुभाष बाळू चव्हाण, हंबीर बाळू चव्हाण, शीला शंकर चव्हाण, युवराज शामराव चव्हाण,  राजाराम लक्ष्मण चव्हाण, राम लक्ष्‍मण चव्‍हाण, बाबासो शंकर फडतरे यांच्या  घरावरील पत्रे, कौले  वादळी वाऱ्यामुळे उडून गेले आहेत .



करमाळे येथील जयसिंग खाशाबा पाटील, संभाजी कुंभार , दादा कांबळे, बळवंत पाटील, संजय कुंभार यांच्या घरांचे नुकसान झाले आहे.तर शिवाजी पाटील यांच्या ट्रॅक्टर वर झाड पडल्याने ट्रॅक्टचे नुकसान झाले आहे.विजेचे खांब आणि तारा तुटल्या आहेत. प.त.शिराळा येथील घागरेवाड्यातील १५ ते २०घरात ओढ्याचे पाणी घुसल्याने घरातील साहित्य भिजले आहे.



 वादळाचा केंद्र बिंदू एम.आय.डी. सी.

सायंकाळी चार वाजता अचानक वादळ सुरू झाले त्यामुळे या परिसरातील अनेक पत्रे उडाले.लोकांना कामगार लोकांना काही कळायच्या आत पत्रे हवेत पाला पाचोळ्या प्रमाणे उडाल्याने सर्वांची घाबरगुंडी उडाली. जवळपास दोन किलोमीटर अंतरात हा वादळी पट्टा होता.त्याचा फटका भटवाडी गावाला बसला. असल्या वादळाचा लोकांनी पहिल्यांदा अनुभव घेतल्याने सर्वांच्या अंगाचा थरकाप उडाल्याचे जखमी रोहित माळी यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments