डि.वाय.एस.पी. अंकुश इंगळे |
सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी |
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, |
अंजली कांबळे:तांदुळवाडी
घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना तडसर वांगी हद्दित धनाजी भिमराव कोळी यांच्या खुन प्रकरणातील आरोपींना 48 तासात स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांना यश आले आहे.
याबाबत तडसर वांगी पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी, 1 जुन रोजी दुपारी तडसर गावच्या हद्दित श्रीधर पवार यांच्या उसाच्या शेतात धनाजी भिमराव कोळी ( वय ४५ ) रा. कुंडल . ता . पलुस यांचा धारदार शस्त्राने खुन करण्यात आला होता. या घटनेची नोंद चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात झाली आहे . .जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षीत गेडाम , अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबूले यांनी चिंचणी पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोथ घेणेबाबत स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड व चिंचणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार अज्ञात आरोपींना पकडण्यासाठी दोन पथके करण्यात आली होती.. घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना अत्यंत शिताफीने गोपनीय व तांत्रिक कौशल्याने आरोपीचा ठावठिकाणा शोधुन सागरेश्वर परिसरातुन पृथ्वीराज उफ॔ किशोर बाजीराव पाटील ( वय ३०), रितेश राजु थोरात ( वय १९ ) या दोघांना अटक केली तसेच त्यांचे सह्कारी शब्बीर जहांगीर शेख ( वय १९) ,कुणाल सतिश सवणे ( वय १८ ) हे दोघेही कोविड पॉझिटीव्ह असल्याने त्याना अटक केले नाही. हे सव॔ राहणार नागराळे ता .पलुस येथील आहेत.. त्यानी गुन्हा कबूल केला असुन मयत धनाजी कोळी हा पृथ्वीराज उफ॔ किशोर पाटील यांचे ८० हजार रूपये देणे होता . हे पैसे किशोर पाटील सतत मागत असताना धनाजी कोळी हा मी तुझे पैसे देत नाही काय करायच ते कर असा म्हणला होता या रागापोटी किशोर पाटील व त्याच्या सहकारी यांनी कोळी यांचा खुन केला.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महादेव शिंदे , सहाय्यक पो फौजदार अधिकराव वनवे , पो .हेड काॅ अशोक परीट , गणेश तांदळे , पो .नाईक विशाल साळुंखे , सतिश मोहिते , पो. काॅ पवन जाधव ,अजय धोत्रे , राहूल कुंभार आदिसह स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कम॔चारी संदिप गुरव , चेतन महाजन , कुबेर खोत , मच्छींद्र बरडे सहभागी होते..
0 Comments