BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सातत्य ठेवून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारा पत्रकार संघ म्हणजे प्रेस क्लब ऑफ शिराळा

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील २३,पन्हाळा तालुक्यातील १,शाहूवाडी तालुक्यातील १,अशा एकूण २५ गावात ७३ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,भटवाडी,बिळाशी, धामवडे, इंगरुळ,मणदूर,नाटोली, पाडळेवाडी,करुंगली, पाचुंब्री,शाहूवाडी तालुक्यातील शित्तुर, पन्हाळा तालुक्यातील सावर्डे,प्रत्येकी १,औंढी, कणदूर, टाकवे,प्रत्येकी २,चिंचोली,कांदे,प्रत्येकी ३,अंत्री बुद्रुक,बिऊर,चिखलवाडी,प्रत्येकी ४,भाटशिरगाव, कोकरूड,प्रत्येकी ५,वाकुर्डे बुद्रुक ६,मांगले,शिराळा, प्रत्येकी ७,सांगाव ८ अशा एकूण ७३ रुग्ण सापडले आहेत.

----------------------------------------------------------------------

प्रेस क्लब ऑफ शिराळा सातत्य ठेवून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारा पत्रकार संघ. नगराध्यक्षा सौ. सुनिता निकम

शिराळा :प्रेस क्लब ऑफ शिराळा म्हणजे सातत्य ठेवून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारा पत्रकार संघ असल्याचे मत नगराध्यक्षा सौ. सुनिता निकम यांनी व्यक्त केले.

 प्रेस क्लब ऑफ शिराळाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व निराधार महिलेला साडी चोळी वितरण कार्यक्रम वेळी त्या बोलत होत्या. मुख्याधिकारी योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

  नगराध्यक्षा सौ. सुनिता निकम म्हणाल्या, प्रेस क्लब ऑफ शिराळा स्थापनेपासून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. त्यामुळे समाजातील वंचित व उपेक्षित नागरिकांना न्याय मिळत आहे. त्यांचे सामाजिक कार्यात सातत्य आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना अमलात आणल्यामुळे समाजाला वेगळी दृष्टी मिळत आहे. कोरोनाच्या पहिल्या दिवसापासून हे पदाधिकारी शासकीय यंत्रणेच्या सोबतीने समाजासाठी योगदान देत आहेत.


       मुख्याधिकारी योगेश पाटील म्हणाले, प्रेस क्लब ऑफ शिराळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा प्रशासनाशी समन्वय योग्य प्रकारे असल्याने काम करायला अधिक ऊर्जा मिळते. प्रेस क्लब ऑफ शिराळा यांच्या माध्यमातून झालेली समाजोपयोगी कामे इतरांना मार्गदर्शक आहेत. गतवर्षीच्या कोरोनापासून त्यांनी केलेले काम आणि दुर्लक्षित घटकांना दिलेला न्याय उल्लेखनीय आहे. 

      प्रारंभी नागकट्टा येथे नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये जास्त ऑक्सिजन देणाऱ्या १० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. प्रेस क्लबचे अध्यक्ष विनायक गायकवाड यांनी मागील दीड वर्षात केलेल्या कामाचा आढावा सांगितला. यावेळी उद्योजक राजेंद्र निकम, माजी ग्रामपंचायत सदस्य दिनेश हसबनीस, डॉ. शिवाजीराव चौगुले, प्रितम निकम, अजित महाजन, विठ्ठल नलवडे, विकास शहा उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments