BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वडिलांच्या स्मरणार्थ प्राथमिक आरोग्य केंद्रास चाळीस हजारांचे वैद्यकीय साहित्य प्रदान

 


शिराळा :अंत्री बुद्रुक (ता शिराळा) येथील माजी उपसरपंच सुनिल पाटील आणि त्यांचे बंधु माजी सैनिक भगवान पाटील यांनी सामाजिक बांधिलकीतुन  वडिलांच्या स्मरणार्थ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास  चाळीस हजारांचे वैद्यकीय साहित्य  दिले.

      माजी उपसरपंच सुनिल पाटील व माजी सैनिक भगवान पाटील यांचे वडील शामराव दादू पाटील यांचे  निधन झाले. कोरोनाची परिस्थिती गंभीर असून शासन निर्देश आणि  लॉकडाऊन याचा विचार करता त्यांनी रक्षाविसर्जन, दहावा आणि तेरावा हे सर्वच विधी अत्यंत सध्या पद्धतीने घेवुन सामाजिक बांधिलकी जपत रक्षाविसर्जन वृक्षारोपण करून केले. दहावा आणि तेराव्याचा खर्च टाळून गावतील प्राथमिक आरोग्य केंद्राला  चाळीस हजाराचे वैद्यकीय साहित्य देऊन नवीन आदर्स निर्माण केला आहे.

    वैद्यकीय अधिकारी डॉ गणेश राजमाने म्हणाले ,  सुनिल पाटील , भगवान पाटील यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. इतरांनी सुद्धा वाढदिवस, इतर समारंभावरील अनावश्यक खर्च टाळून मदतीची भूमिका ठेवली पाहिजे.

    यावेळी माजी उपसरपंच सुनिल पाटील , माजी सैनिक भगवान पाटील , ग्रामसेवक वसंत इंगवले , सरपंच तेजस गावडे , उपसरपंच राजेंद्र चव्हाण , संचालक प्रकाश पाटील , डॉ. गणेश राजमाने , डॉ. स्वप्नील पवार  , विलास चौगुले, रामजी पाटील, अर्जुन पाटील ,बाजीराव पाटील, गणेश पाटील,  संचालक उत्तम पाटील, प्रल्हाद पाटील ,मुख्याध्यापक संजय पाटील,  बबन नांगरे , आरोग्य सेवक अनिल झाडे  यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.    

 

वडिलांच्या विचाराचा वारसा पुढे चालविताना समाधान वाटत आहे . नेहमीच इतरांना मदत करावी ही शिकवण वडिलांनी आम्हाला दिली आहे.  

माजी उपसरपंच सुनिल पाटील


Post a Comment

0 Comments