BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महाविद्यालयातील विविध अनावश्यक विभागांच्या फी रद्द करुन ट्युशन फी मध्ये ५०% सवलत मिऴावी या मागणीबाबत शासनस्तरावर 10 जुन पर्यंत निर्णय न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात सरकार विरुद्ध तीव्र आंदोलन

"महाविद्यालयातील विविध अनावश्यक विभागांच्या फी रद्द करुन  ट्युशन फी मध्ये ५०% सवलत मिऴावी या मागणीबाबत शासनस्तरावर 10 जुन पर्यंत  निर्णय  न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात सरकार विरुद्ध तीव्र  आंदोलन करण्याचा निर्णय संयुक्त विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या ऑनलाईन बैठकीत झाला.

 यावेऴी महाभयंकर परिस्थितीची पार्श्वभूमी पाहता, "महाविद्यालयातील विविध अनावश्यक विभागांच्या फी रद्द करण्यासाठी आणि ट्युशन फी मध्ये ५०% सवलत मिळण्यासाठी" गेले आठ ते नऊ महिने संयुक्त विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी वैयक्तिक पातळीवर आणि एक ते दीड महिना संघटनात्मक पातळीवर सातत्याने लढा देत आहेत. ही चळवळ सुरू करत असताना जवळपास चाळीसहुन अधिक लोकप्रतिनिधींसोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात भेटून चर्चा केली. बहुतांशी लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्याकडे शिफारस  केली. दरम्यानच्या काळात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश निकम, प्रदेशाध्यक्ष संकेत कचरे, प्रदेश महासचिव संकेत पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष स्वप्नील पवार  यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी उदय सामंत  याची दोन वेळा प्रत्यक्ष भेट घेत परिस्थितीची आणि संघटनेच्या मागणीची विस्तृत माहिती दिली. त्यावेऴी  बैठक लावण्याचे आश्वासन दिले. परंतु अद्याप कसल्याही प्रकारची बैठक सरकारद्वारे आयोजित केलेली नाही. त्यामुऴे 10 जुन पर्यंत सरकार द्वारे कोणताही निर्णय न झाल्यास  विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात सरकार विरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्णय झाला. 

यावेऴी  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश निकम, प्रदेशाध्यक्ष संकेत कचरे, प्रदेश महासचिव संकेत पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष स्वप्नील पवार ,शिराळा तालुका अभियांत्रिकी शाखा उपाध्यक्ष जयदीप पाटील ,कार्याध्यक्ष यश वनारे, महासचिव सत्यम वरेकर, अनिकेत चरापले, अक्षय धुमाळ, आकाश वरेकर , यश दिवे  उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments