BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण‌ केल्यास शैक्षणिक दर्जा सुधारेल - मधुवंती धर्माधिकारी

 


शिराळा: समाजाने पुढे येवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण केल्यास विद्यार्थी स्वयंपूर्ण होतील व  शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होईल असे प्रतिपादन आरळा केंद्राच्या केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी यांनी केले.त्या जिल्हा परिषद शाळा इनामवाडी आरळा येथे ग्रामप़चायत सदस्या सुनिता पाटील यांच्यामार्फत सर्वच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, पेन,पेन्सिल व खाऊ वाटून नवागताचे स्वागत कार्यक्रमात बोलत होत्या.यावेळी शैक्षणिक साहित्य वाटप करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुनिता पाटील,मुख्याध्यापिका पुनम मसुटगे,शिक्षिका शुभांगी पवार,शितल पाटील सिद्धार्थनगर शाळेचे मुख्याध्यापक मोहन पवारआदी मान्यवर उपस्थित होते..यावेळी ग्रामपंचायत सदस्या पाटील म्हणाल्या की समाजातील तळागाळातील सर्व घटकांसाठी आपले देणे समजून सहकार्य करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे.यावेळी सन 2021/22या शैक्षणिक वर्षासाठी शाळेची शंभर टक्के पटनोंदणी पहिल्याच दिवशी उत्साहात झाली.या कार्यक्रमासाठी जयश्री चौगुले,विजया चव्हाण,सुरेखा चव्हाण आदी पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन पुनम मसुटगे यांनी तर आभार शुभांगी पवार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments