BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आरोग्य यंत्रणेच्या सोबतीने समाजासाठी योगदान देण्यात वेगळेच समाधान मिळते- राजेंद्र इथापे




शिराळा,आरोग्य यंत्रणेच्या सोबतीने समाजासाठी योगदान देण्यात वेगळेच समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन  इतिहास अभ्यासक एल,आय,सी, विकास अधिकारी राजेंद्र इथापे यांनी केले.

    जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त शिराळा कोव्हिड सेंटर मध्ये राजेंद्र इथापे व स्वराज्य फाऊंडेशन यांच्याकडून रुग्णांना पौष्टिक आहार वाटप करण्यात आला. प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीराम नांगरे प्रमुख उपस्थित होते.

       राजेंद्र इथापे म्हणाले, समाजातील दानशूर मंडळींना एकत्र करून प्रेस क्लब ऑफ शिराळा व तालुका मराठी पत्रकार संघाचे वतीने सुरू असलेला पौष्टिक आहार वाटप कार्यक्रमामुळे या सामाजिक कार्यात आम्हाला सहभागी होता आले. सध्या सार्वजनिक क्षेत्राला अशा उपक्रमांची गरज आहे. तालुक्यामध्ये पुढाकार घेऊन पत्रकार बांधव सामाजिक हित जोपासत आहेत.  

पौष्टिक आहार वाटप कार्यक्रमास डॉ. सौ.गायत्री यमगर, नेत्र चिकित्सा अधिकारी सौ सविता नलवडे, दिनेश हसबनीस, विनायक गायकवाड, डॉ. शिवाजीराव चौगुले, अजित महाजन प्रताप कदम, महेश बिळासकर, प्रितम निकम, विठ्ठल नलवडे, विकास शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments