जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाची शपथ
आपला जीव वाचवण्यासाठी ऑक्सिजन महत्वाचा आहे. तो मुबलक प्रमाणात मिळवण्यासाठी पर्यावरण संवर्धन काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन रुद्राक्षा फौंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी खलिपे यांनी केले.
जागतीक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या आँनलाईन बैठकीत बोलत होत्या. यावेऴी त्या म्हणाल्या, जागतिक पर्यावरण दिना निमित्त रुद्राक्षा फौंडेशनच्या सदस्यांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन पर्यावरण वाचण्याचा वसा हाती घेतला आहे. कोरोना काळात देशावर खूप मोठे संकट कोसळले आहे. सध्याची परिस्थिती पहाता कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.पर्यावरणाची झालेली हानी ही माणसांच्या हस्तक्षेपामुळेच झालेली आहे. त्यामुळे आज आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अजूनही जर आपल्यात काही बदल नाही झाला तर जग विनाशाकडे जाईल. म्हणून युवा पिढीने पर्यावरण संवर्धनाचे गंभीर्याने पहाणे गरजेचे आहे.
प्रारंभी सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेवुन आपल्या परिसरातील वृक्षसंवर्धन करण्याचा वसा घेतला. लहानांपासून युवावर्गापर्यंत सर्वांनी झाडांना पाणी घालून वृक्षसंवर्धनाचे काम सुरू करुन वृक्षारोपण ही केले.
या उपक्रमात फौंडेशन अध्यक्ष अश्विनी खलिपे, ईश्वरी यादव, पूर्वा यादव, हर्ष डोंगरे, आयुष शिंदे, सोनाली माने, योगिता जाधव, सागर यशवंत, पूनम देवकर, पल्लवी मोहिते, आयेशा लोहोरा, इंद्रनील खलिपे, हरुबाई यशवंत, विजयालक्ष्मी यशवंत, भारती यशवंत, सोहम यशवंत, राजवीर मोहिते, सानिका मोहिते, सुप्रिया खाडे आदींनी सहभाग नोंदवला.
0 Comments