कोरोनाच्या प्रादुर्भावणे यावर्षी तिथीनुसार होणारा श्री शिवराज्याभिषेक साधेपणाने साजरा करण्यात आला. महाराजांच्या प्रतिमेच पूजन करून वृक्षारोपणास सुरवात करण्यात आली. गावच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच स्मशानभूमी परिसर,मंदिर परिसर आणि कुस्तीच्या मैदानाशेजारी विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.त्यामध्ये वड,पिंपळ,गुलमोहोर, कडुलिंब,आवळा,चिंच,बॉटल पाम,बेल,चंदन अशा विविध वृक्ष प्रजातींची लागवड करण्यात आली. कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वांनाच निसर्गामध्ये विनामूल्य मिळणाऱ्या ऑक्सिजनची किंमत समजली, सर्वांनाच वृक्षांच महत्व समजलं.निसर्गाचा समतोल राखण किती गरजेचं आहे हे पटलं.आणि ह्याच विचारातून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावातील प्रत्येकाने आपापला वाटा उचलून,लोकवर्गणीतून हा उपक्रम पूर्णत्वास गेला.
माजी सभापती हणमंतराव पाटील म्हणाले,दरवर्षी आपण वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. झाडे मोठी होईपर्यंत संगोपन करणेसुद्धा आपली जबाबदारी आहे.
विश्वास कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील म्हणाले,गावोगावी असे उपक्रम राबवून लोकांना आणि तरुणांना वृक्षारोपणाच महत्व पटवून द्यायला हवे. कारण पर्यवरण संवर्धन ही काळाची गरज आहे.
यावेळी माजी सभापती हणमंतराव पाटील,संचालक शिवाजी पाटील,सरपंच सर्जेराव पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील,सह्याद्री संघाचे संचालक मानसिंग पाटील,पोलीस पाटील संभाजी मोहिते,पै.मोहन पाटील,माजी सरपंच राजाराम पाटील,मुख्याध्यापक वाय. सी.पाटील ,डॉ.विजय पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक ,ग्रामस्थ आणि मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments