शिराळा : अडचणीत आलेला देशातील साखर व्यवसाय टिकवायचा असेल तर केंद्र शासनाने साखर निर्यात धोरण खुले ठेऊन निर्यात साखरेचे अनुदानही कायम ठेवावे. साखरेची किमान किंमत ३ हजार ५०० रुपये करावी, असे प्रतिपादन अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक केले.
चिखली (ता. शिराळा) येथील 'विश्वास' कारखाण्यात आज (ता. १४) रोलर पूजन व ८ मे. वॅट क्षमतेचे टर्बाईन बसवणे कामाचे भुमिपुजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर प्रमुख उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, २०२०-२१ कोरोना संसर्ग असतानाही करखाण्याने उत्कृष्ट कामगिरी करत गळीत हंगाम यशस्वी केला. ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी मोठे सहकार्य केले. या हंगामातील गाळप ऊसाला आतापर्यंत पाहिले व दुसऱ्या बिलाच्या माध्यमातून २ हजार ७५० रुपये अदा केले आहेत. अंतिम बिल दीपावलीस देऊन दीपावली गोड करणार आहे.
प्रारंभी कार्यकारी संचालक राम पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संचालक विश्वास कदम यांच्या हस्ते रोलर पूजन झाले. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष, युवा नेते मा. विराज नाईक यांच्या हस्ते ८ मे. वॅट क्षमतेचे टर्बाईन बसवणे कामाचे भुमिपुजन झाले. यावेळी विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, 'प्रचिती' संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, संचालक सर्वश्री. विजयराव नलवडे, संभाजी पाटील, विश्वास पाटील, सुरेश पाटील, मानसिंग पाटील, शिवाजी पाटील, बिरुदेव आमरे, दत्तात्रय राणे, शामराव मोहिते, यशवंत दळवी, विष्णू पाटील, बाळासाहेब पाटील, हंबीरराव पाटील, तानजी वनारे, दत्तात्रय पाटील, यु. जे. पाटील, कामगार संघटना अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजयराव देशमुख, सचिव सचिन पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, सभासद, कर्मचारी आदी उपस्थित होते.
0 Comments