BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सोयाबीन पिक प्रात्यक्षिक प्रकल्पासाठी कापरीची निवड

 

 

कापरी.( ता.-शिराळा .)गावाची खरीप हंगाम सन 2021 मध्ये सोयाबीन पिक प्रात्यक्षिक प्रकल्पासाठी निवड झाली आहे. कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत व श्री जनाईदेवी शेतकरी बचत गट कापरी यांच्या माध्यमातून कापरी गावामध्ये हा प्रकल्प राबविला जात आहे .

या प्रकल्पातर्गत येथील 25 शेतकर्यांची निवड केली असुन प्रती शेतकरी 1 एकर याप्रमाणे 25 एकर क्षेत्रावर सोयाबीन पिक प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे.

शेतकर्यांना मशागती पासुन पिक काढणी पर्यंत सखोल व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले जाणार आहे.प्रकल्पातर्गत शेतकर्यांना फुले संगम या सुधारीत वाणाचे सोयाबीन बियाणे व बिजप्रक्रिया निविष्टा यांचे मोफत वाटप करण्यात आले तसेच लाभार्थी शेतकर्यांना बिजप्रक्रिया आणी  पेरणी व टोकण पध्दतींचे प्रात्यक्षिक करून दाखविले .

या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी श्री. जी.एस.पाटील, मंडल कृषी अधिकारी श्री. एस .डी. घागरे,कृषी पर्यवेक्षक श्री. जे.के.खोत,  सहाय्यक कृषी अधिकारी श्री. एस.एन.अजेटराव, बचत गटाचे अध्यक्ष अमोल पाटील, सचिव प्रसाद पाटील,सदस्य व लाभार्थी शेतकरी उपस्थितीत होते.

Post a Comment

0 Comments