BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोविड रुग्णांना औषधा एवढीच मानसिक आधाराची गरज-डॉ.शैलेश माने

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील ३१ ,वाळवा, शाहूवाडी, पलूस, कराड तालुक्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील ,प्रत्येकी १ अशा एकूण ३६ गावात ९२ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, बांबवडे, भाटशिरगाव, चिंचोली, देववाडी, धसवाडी, इंगरुळ, जांभळेवाडी, काळुंद्रे, कांदे, मणदूर,सय्यदवाडी, शिवरवाडी,शाहूवाडी तालुक्यातील सरुड,कराड तालुक्यातील ओगलेवाडी,पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी,कोल्हापूर जिल्ह्यातील चेनवाड,प्रत्येकी १ ,बेलदारवाडी, बिळाशी, मोंडेवाडी, करमाळे, कोकरूड,पावलेवाडी,शिंदेवाडी,तडवळे,वाळवा तालुक्यतील ठाणपुडे,प्रत्येकी २,कणदूर,रेड,प्रत्येकी ३, चिखलवाडी, धामवडे, शिराळा,करूंगली,प्रत्येकी ४,बिऊर ५, मांगरूळ, चिखली, प्रत्येकी ६,सागाव ७,मांगले १२,असे एकूण ९२ रुग्ण सापडले आहेत.


शिराळा, ता.९: कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी रुग्णांना औषधा एवढीच आधाराची गरज आहे. हा आधार देण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी पुढे येण्याची गरज  असल्याचे प्रतिपादन साई हॉस्पिटलचे डॉ.शैलेश माने यांनी केले.

प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आय.टी. आय कॉलेज व  उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी दररोज मोफत आहार वाटप उपक्रम सुरू  आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने बिळाशी येथील डॉ.एन.के.पाटील यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने  स्वराज्य फाउंडेशनच्यावतीने आयोजित केलेल्या आहार वाटप प्रसंगी बोलत होते.यावेळी डॉ.प्रकाश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ.माने म्हणाले, स्वराज्य फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रमात नेहमीच सहभाग असतो.डॉ.एन.के.पाटील यांनी कोकरूड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. ते सेवानिवृत्त असले तरी रुग्णांशी त्यांनी जोडलेली आपुलकीची नाळ कायम ठेवली आहे.त्यामुळेच त्यांच्या  व त्यांच्या लग्नाच्या अशा दुहेरी वाढदिवसाच्या निमित्ताने स्वराज्य फाउंडेशनने कोविड रूग्णांच्यासाठी सलग पाच दिवस आहार वाटप सुरू ठेवून त्यांना खऱ्या अर्थाने धीर देण्याचे काम केले आहे.

 यावेळी डॉ.प्रकाश मोरे, नेत्र चिकित्सक अधिकारी सविता नलवडे,सुनिल जीवनकुमार रणदिवे, शशिकांत कांबळे,राणी खुडे, यशश्री जाधव, वैशाली पवार,विशाखा सवाइराम, सुनीता फाळके, विश्वास यादव, दिनेश हसबनीस,विनायक गायकवाड, शिवाजीराव चौगुले, प्रताप कदम, अजित महाजन, प्रीतम निकम, सचिन पाटील, विजय गराडे, मनोज मस्के,विठ्ठल नलवडे,विकास शहा उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments