BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आईच्या मृत्यूनंतर काही तासात मुलीच्या मृत्यूने त्या कायमचा एकमेकींच्या कुशीत विसावल्या


शिराळा, ता.२०: खरं तर मायलेकरांचं नात किती अतूट असते हे सर्वज्ञात आहे. माझ्या नंतर माझ्या मतीमंद असणाऱ्या लेकीचं काय होईल हीच चिंता तिला काय सतावत होती. अखरे त्या माऊलीचा मृत्यू होताच अवघ्या काही तासात त्या मतीमंद मुलीचा ही मृत्यू झाला. खरोखरंच नियतीने आईची आर्त हाक ऐकली. मायलेकींना मृत्यू नंतर ही एकत्र करून आईची जिवंतपणाची चिंता मिटल्याने एकमेकींच्या कुशीत कायम विसावल्या.

ही दर्दभरी कहाणी शिराळा तालुक्यातील शिवरवाडी येथील  किसाबई बेंद्रे व चंदा  बेंद्रे या मायलेकींची. मोहन व भगवान बेंद्रे यांच्या वडिलांचे पंधरा वर्षांपूर्वी निधन झाले. आई किसाबई व मतीमंद असणारी बहीण चंदा, मोहन व भगवान आणि त्यांच्या पत्नी आणि मुलं असे ११ जणांचं कुटुंब. चंदा ही लहानपणापासून मातीमंद असल्याने  ती अविवाहित होती.त्यामुळे तिचे पालन पोषण करण्याची जबाबदारी घरच्या लोकांच्यावर होती. या मायलेकी नेहमीच एकमेकींच्या सहवासात २४ तास एकत्र असल्याने आपल्या पश्चयात आपल्या मुलीचे काय होणार याची धास्ती आईला होती. वय झाल्याने एक महिन्यापासून आई हळूहळू अंथरुणाला खिळली होती. मात्र त्या लुकलूकणाऱ्या डोळ्यात त्या मतीमंद मुलीचा चेहरा दिसत होता.तिच्या भविष्याची चिंता दिसत होती.आता माझ्या लेकीचं कसं होणार हा मनात सतत वचार घोळत होता. आई अंथरुणावर खिळल्याने मुलगी ही व्यकुळ होऊन आपणाला जमेल त्या प्रमाणे आईची सेवा करत होती. तिला ही तिच्या उर्वरित आयुष्याची काळजी वाटत असावी. हा मायलेकींची मूक संवाद सुरू असताना अखरे नियतीने आपला डाव साधला.

शनिवारी( ता.१९) रात्री ११ वाजण्याचा सुमारास आई  किसाबाई यांचे ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यावेळी मातीमंद असणाऱ्या चंदाला मानसिक धक्का बसला. आईला अंत्यसंस्काराला नेत असताना तिने आईचे शेवटचे दर्शन घेऊन तिला ओवाळले. मध्यरात्री  २ वाजण्याच्या सुमारास आईवर अंत्यसंस्कार  करून ग्रामस्थ आपापल्या घरी गेले.  आज रविवारी (ता.२०) रोजी सकाळी घरातील लोक उठले. चंदाला   उठवायला गेले तर तिचे  झोपेतच निधन झाले होते.. आईच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने मुलीचा अवघ्या काही तासात मृत्यू झाल्याने शिवरवाडी गावावर शोककळा पसरली आहे. मायलेकींची काही क्षणात ताटातूट झाली असली तरी नियतीने पुन्हा त्यांना कायमच्या एकत्रित करून त्यांच्या आयुष्याचा कायमचा प्रश्न मिटवला. मायलेकींच्या या अनोख्या प्रेमाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Post a Comment

0 Comments