शिराळा , ता .२५ : येथील मोरणा धरण बांधल्यापासून पहिल्यांदा जून महिन्यात भरले असून या पाण्याची ओटी भरण व पाणी पूजन इस्लामपूर विभागाचे उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे यांच्या हस्ते करण्यात आले .
दमदार पावसामुळे या वर्षी प्रथमच वाकुर्डे , अंत्री , टाकवे , रेठरे हे तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून त्या ठिकाणी ही पाणी पूजन व ओटी भरण करण्यात आले आहे . यावेळी मोरे म्हणाले , प्रथमच जून महिन्यात हे प्रकल्प भरले असल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे . वाकुर्डे योजनेचे पाणी या प्रकल्पात आणून पाणी वर्षभर पुरेल याचे नियोजन करण्यात आले आहे . यावर्षी वारंवार पडणाऱ्या पावसामुळे धरण , तलाव व पाझर तलाव यांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असल्याने रब्बी पिकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे . जून महिन्यात तलाव व धरण भरण्याची ही पहिलीच वेळ आहे . सरासरी जुलैमध्ये शेवटच्या आठवड्यात धरण व तलाव भरले जात होते.मात्र यावर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत . यावेळी शाखाधिकारी एस.के.पाटील , अनिल पाटील , चंद्रकांत यादव , श्रीपती देसाई , उपस्थित होते .
0 Comments