BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कै.यशवंत खेत्री साळुंखे (आप्पा निगडीकर) यांची आज ३५ वी पुण्यतिथी.

 


प्रतीक साळुंखे/निगडी:

 

निगडी गावचे सुपुत्र शिराळा पंचायत समितीचे आदर्श सभापती कै.यशवंत खेत्री साळुंखे (आप्पा निगडीकर) यांची आज ३५ वी पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा-------

आप्पांची राजकीय सुरुवात निगडी गावच्या सरपंचपदापासून झाली. दीर्घकाळ सरपंच राहिल्यानंतर ते पंचायत समितीवर प्रचंड मतांनी निवडून आले.  १९८३ साली पंचायत समितीचे सभापती झाले. तत्कालीन मंत्री विधानपरिषदचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख  यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालीन जि.प. अध्यक्ष माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक  व शिराळा पंचायत समिती सभापती कै. आप्पा यांच्या माध्यमातून  विकास कामे त्या काळामध्ये तालुक्यात झाली.

ते उच्चशिक्षित नसतानासुद्धा सर्वसामान्य लोकांची कामे अत्यंत तत्परतेने करणे हाच एकमेव ध्यास त्यांच्या जीवनाचा होता. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्यासाठी मोरणा धरणाचे, वाकुर्डे, मानकरवाडी व उत्तर भागातील विविध तलाव यांचे श्रेय सुद्धा आप्पांच्या कडे जाते. रस्ते, वीज, आरोग्य,नळ पाणीपुरवठा योजना अशा विविध पायाभूत सुविधा उत्तर विभागांमध्ये गावागावांमध्ये पोहचवण्याचे प्रयत्न आप्पांनी केले.

तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील शिराळा येथे दौऱ्यावर आले असता सभापती म्हणून आप्पांनी आयटीआय कॉलेज व एसटी आगार याची मागणी दादांकडे आग्रहाने केली व वसंतदादांनी त्यास तात्काळ मान्यता दिली त्यामुळेच आज हजारो मुले आयटीआय कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत.

कै.शिवाजीराव देशमुख  यांना शिराळा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी आप्पांसह शिराळा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ मुंबईला यशवंतराव चव्हाण यांना भेटण्यासाठी गेले होते . त्या वेळी यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचे तिकीट देशमुख साहेबांना देता येणार नाही असे सांगितल्यानंतर आप्पांनी आपली पादत्राणे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बंगल्या समोर ठेवून शप्पथ घेतली ; की शिवाजीराव देशमुख  आमदार झाल्यानंतर च  मुंबईत येऊन पादत्राणे घालीन. सर्व कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांच्या जोरावर शिवाजीराव देशमुख साहेब अपक्ष म्हणून प्रचंड मतांनी निवडून आले व त्यानंतरच आप्पांनी आपली पादत्राणे घातली.अशा बुद्धिमत्ता, व्यवहारचातुर्य आणि प्रामाणिकपणाचा त्रिवेणी संगम असणाऱ्या आप्पांना विनम्र अभिवादन.



Post a Comment

0 Comments