शिराळा (प्रतिनिधी) : युवा नेते विराज नाईक यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात युवकांचे संघटन मजबूत होईल, असे प्रतिपादन विश्वास कारखाण्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथे सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल युवा नेते मा. विराज नाईक यांचा कारखाण्याच्या संचालक मंडळामार्फत सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे यांनी सर्वांचे स्वागत केले. जिल्हाध्यक्ष नाईक यांचा निवडीबद्दल विश्वासचे उपाध्यक्ष, माजी आमदार पाटील-सरूडकर यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी संचालक सर्वश्री संभाजी पाटील, विश्वास पाटील, सुरेश पाटील, मानसिंग पाटील, शिवाजी पाटील, बिरुदेव आमरे, दत्तात्रय राणे, शामराव मोहिते, यशवंत दळवी, विष्णू पाटील, बाळासाहेब पाटील, तानजी वनारे, दत्तात्रय पाटील यांच्यासह कार्यकारी संचालक राम पाटील उपस्थित होते. संचालक हंबीरराव पाटील यांनी आभार मानले.
0 Comments