BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्या कुटुंबाला गावकऱ्यांनी सावरले


शिराळा: त्या चव्हाण कुटुंबीयांचा संसार पुन्हा गावकऱ्यांनी फुलवून त्यांच्या जगण्याचे मनोदर्य वाढवून गाव करेल ते एकटा राव काय करणार ही म्हण सार्थ ठरवून भटवाडी ग्रामस्थांनी जपली माणुसकी.

वादळी वाऱ्याने एक क्षणात होत्याच नव्हत केलं. संसार उपयोगी साहित्य ,धान्य,कपडे भिजल्याने रहायला सुरक्षित जागा नाही .खायला धान्य नाही. त्यामुळे  चव्हाण कुटुंबातील १३ जणांच्यावर  मुलांबाळासह दुसऱ्याच्या घरी आसरा घेण्याची वेळ आल्याने घर पुन्हा कसं उभा करायचं या विवेनचनेत असणाऱ्या कुटुंबाला  हवा आहे मदतीचा हात. या मथळ्याखाली भटवाडी( ता.शिराळा) येथील वादळात घर गमावलेल्या चव्हाण कुटुंबीयांची व्यथा मंडळी होती. त्याची दखल घेऊन भटवाडीच्या ग्रामस्थांनी विशेषतः युवकांनी आपल्या व्हॅटस अँप ग्रुपवर मदतीचे आवाहन केले.प्रत्येकांनी आपल्याला जमेल त्या प्रमाणे ऑनलाईन पेमेंट  द्वारे निधी संकलित केला. 

शनिवारी ५ जून रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने भटवाडी येथील नरसिंह वस्तीतील प्रकाश विश्वास चव्हाण, विकास विश्वास चव्हाण, दिपक विश्वास चव्हाण यांच्यासहर इतर १० ते १२ घरांचे छप्पर उडाले.यात चव्हाण कुटुंबांच्या घरावरील पत्र्याचे छप्पर उडून गेले.त्यामुळे त्यांचे सर्व संसार उपयोगी साहित्य ,धान्य,कपडे भिजले. आता रहायला सुरक्षित जागा नाही .खायला धान्य नाही. त्यामुळे मुलांबाळासह १३ जणांना दुसऱ्याच्या घरी आसरा घेण्याची वेळ आली होती.  या कुटुंबाला कोरडवाहू जमीनीमुळे उत्पन्नचे दुसरे साधन नसल्याने शिराळा औद्योगिक वसाहतीत मोलमजुरी करून  उदरनिर्वाह सुरू आहे. त्यांचा हा जगण्याचा संघर्ष नियतीला मान्य नाही. कारण त्यांच्यावर आता आलेले हे संकट तिसऱ्यांदा आले आहे. .या पूर्वी ही त्यांना दोन वेळा पाऊस व वादळी वाऱ्याचा फाटक बसला होता.त्या नुकसानीतुन सावरत असताना आता पुनः मोठा फटका बसला आहे.त्यामुळे मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबाचे आर्थिक दृष्ट्या कंबरडे मोडले आहे. आता हा फाटका संसार कसा उभा करायचा या विवंचनेत ते कुटुंब होते.

संसार उपयोगी साहित्य व धान्य भिजल्याने  व चूल बंद असल्याने चव्हाण कुटुंबातील १३ जणांना गावातील लोक दोन वेळचे जेवण व आसरा  देत शेजारधर्म पाळला.

गावातील लोकांनी मदत गोळा करून त्या कुटुंबाच्या घरावर पत्रा घातला,काही धान्य दिले. ग्रामस्थांनी त्या कुटुंबाला हक्काचा निवारा दिला.तर इतर नुकसान झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करून माणुसकी जोपासली.

यावेळी सरपंच विजय महाडिक,  उपसरपंच मच्छिंद्र चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश चव्हाण  , ग्रामपंचायत सदस्य, संपत चव्हाण, बळवंत चव्हाण ,प्रकाश चव्हाण, सुरेश चव्हाण, तुकाराम चव्हाण, हंबीर चव्हाण ,युवराज चव्हाण,  शरद चव्हाण बाबासो फडतरे शिवाजी फडतरे ,   राजाराम चव्हाण,आबासो शिंदे ,विशाल चव्हाण

एकीच्या बळावर त्यांचा संसार पुन्हा सावरला

शासकीय मदतीची वाट न पाहता या गरीब कुटुंबाला आथिर्क मदत करण्यासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेतला आहे.मिळालेल्या निधीतून घरावर पत्रा घालण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करून पावसाळ्यापूर्वी त्यांना निवारा करून दिला.हे केवळ गावच्या राजकारण विरहित असणाऱ्या संघटित ताकदीने शक्य झाले. सामाजिक उवक्रमात गाव नेहमी पुढे असते हे पुनः सिद्ध झाले आहे.

सरपंच विजय महाडिक

त्यांची श्रमातून मदत

त्या कुटुंबाला आपण आर्थिक मदत करू शकत नसलो तरी श्रमातून मदत करण्याचे ठरवून बाबासो शिंदे व विशाल चव्हाण या मिस्त्री या कुटुंबाच्या घरावर मोफत पत्रा घालून देत श्रमरुपी मदत केली



Post a Comment

0 Comments