BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सामाजिक कार्यात स्वराज्य फाउंडेशनचा नेहमीच पुढाकार-प्रताप पाटील

 


शिराळा: येथील कोविड रुग्णांनसाठी डॉ.विनायक धस यांच्याकडे आहार सुपूर्द करताना प्रताप पाटील, डी. के. कुंभार,  सचिन पाटील,  गणेश साळुंखे,  धनाजी साळुंखे, सत्यजित पाटील,  आकाश लोहार,  निलेश पाटील

शिराळा,ता.७:सामाजिक कार्यात स्वराज्य फाउंडेशनचा नेहमीच पुढाकार असतो. डॉ.एन.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची वाटचाल सुरू आहे. एक सामाजिक बांधिलकी व समाज्याचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून संस्थेच्यावतीने आम्ही कोरोना रुग्णांना आहार वाटप करत असल्याचे प्रतिपादन स्वराज्य फाउंडेशनचे प्रताप पाटील यांनी केले.

 प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आय.टी. आय कॉलेज व  उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी मोफत आहार देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या निमित्ताने डॉ.एन.के.पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने कोविड रुग्णांना  मोफत आहार वाटप केले.त्यावेळी ते  बोलत होते.

 यावेळी डॉ. विनायक धस, डॉ.ऐश्वर्या मोरे, स्वराज्य फाउंडेशनचे प्रताप पाटील,  डी. के. कुंभार,  सचिन पाटील,  गणेश साळुंखे,  धनाजी साळुंखे, सत्यजित पाटील,  आकाश लोहार,  निलेश पाटील,पत्रकार दिनेश हसबनीस, विनायक गायकवाड, शिवाजीराव चौगुले, सचिन पाटील, प्रताप कदम अजित महाजन, प्रीतम निकम, विजय गराडे, मनोज मस्के,विठ्ठल नलवडे,विकास शहा उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments