BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सवेरा मोटर ड्रायव्हिंग स्कुलची सामाजिक बांधिलकी

 

शिराळा, ता.१२:येथील सवेरा मोटर ड्रायव्हिंग स्कुलच्यावतीने मालक शब्बीर मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त शिराळा येथे उपजिल्हा रुग्णालय व आय. टी. आय येथे उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांच्यासाठी पौष्टीक आहार वाटप करण्यात आला.

प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आय.टी. आय कॉलेज व  उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी दररोज मोफत आहार वाटप उपक्रम सुरू  आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकी म्हणून सवेरा मोटर ड्रायव्हिंग स्कुलच्यावतीने मालक शब्बीर मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त  आहार वाटप करण्यात आला. यावेळी डॉ.स्वप्नील मगदूम,डॉ.ऐश्वर्या मोरे व तन्वीर मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी वैशाली पवार, जीवन रणदिवे, पांडूरंग पाटील, सलीम मेहत्तर, दिनेश हसबनीस,विनायक गायकवाड, शिवाजीराव चौगुले, प्रताप कदम, अजित महाजन, प्रीतम निकम, सचिन पाटील, विजय गराडे, मनोज मस्के,विठ्ठल नलवडे,विकास शहा उपस्थित होते. 


शिराळा: शिराळा तालुक्यातील २९,पन्हाळा तालुक्यातील १अशा एकूण ३०,गावात ५९ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव् आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,अस्वलेवाडी,बिळाशी, चिखलवाडी,खेड, खुजगाव,कुसाईवाडी, माळेवाडी,मणदूर,पणुंब्रे तर्फ शिराळा,पणुंब्रे वारुण, रांजणवाडी,रेड,शिराळे खुर्द,शिरशी,तडवळे,वाकुर्डे खुर्द,पन्हाळा तालुक्यातील सावर्डे, प्रत्येकी १,भागाईवाडी,कणदूर,कोकरूड,नाटोली,शेडगेवाडी,प्रत्येकी २,भाटशिरगाव,कांदे,सागाव,टाकवे,वाकुर्डे बुद्रुक,प्रत्येकी ३,अंत्री बुद्रुक ४,मांगले ६,शिराळा ७,असे एकूण ५९ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments