BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पाच जून रोजी पाऊस व वादळाने झालेल्या नुकसान भरपाईची सत्यजित देशमुख यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी


शिराळा,ता.३०:शिराळा एम.आय.टी.सी सह  तालुक्याच्या उत्तर भागात पाच जून रोजी वादळी वारा व ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानची भरपाई शेतकरी व उद्योजक यांना द्यावी या मागणी चे निवेदन सांगली जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष  सत्यजित देशमुख यांनी दिले. 

      या निवेदनात म्हटले,शिराळा तालुक्यात पाच जून रोजी झालेल्या वादळी वारा व ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी यामुळे शिराळा  एम.आय.डी.सी मधील अनेक उद्योग व्यवसाय असणाऱ्या इमारती वरील  पत्रे,पत्राच्या शेड उडून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. इमारतीच्या भिंती देखील पडल्या आहेत.यामध्ये  व्यावसायिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.तसेच या विभाग असणाऱ्या भटवाडी,औढी,करमाळे, या गावातील लोकांच्या राहत्या  घरावरील पत्रे उडून गेले आहेत. जनावरांच्या वस्ती असणाऱ्या शेडचे देखील मोठे नुकसान झालेले आहे. अनेक कुटुंबांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने कुटुंबांचे संसार उघड्यावरती आलेले आहेत. शिरशी कोंडाईवाडी, धामवडे, गिरजवडे,घागरेवाडी, प.त.शिराळा, निगडी, करमाळे,औंढी, भटवाडी,खेड,शिवरवाडी, आंबेवाडी,सह तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावांमध्ये प्रचंड मोठा पाऊस झाल्याने शेत जमिनीतील नाला बांध फुटून गेले आहेत. शेतकर्‍यांनी पेरणी केलेले बियाणे देखील वाहून गेले. शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान या मध्ये झालेले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे महसूल विभाग यंत्रणेमार्फत करण्यात आले आहेत. साधारणता ४ कोटी ७५ लाख रुपये  नुकसान झाले असल्याचा पंचनामा अहवाल तहसील कार्यालय शिराळा मार्फत शासनाकडे पाठवण्यात आला असून या नुकसानग्रस्त,शेतकरी व उद्योजकांना नुकसान भरपाई मिळावी.

Post a Comment

0 Comments