BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महाविद्यालयीन फी मध्ये ५०% टक्के सवलत व इतर अनावश्यक फी कमी करा- खासदार धैर्यशील माने

 


शिराळा: कोरोना काळात सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे त्यांचा विचार करुन महाविद्यालयीन फीमध्ये ५०% टक्के सवलत व इतर अनावश्यक फि कमी करण्याबातचे लेखी निवेदन खासदार धैर्यशील माने यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी.टी.शिर्के यांना दिले.

   कोवीड च्या महामारीमुळे टाळेबंदीची परिस्थीती निर्माण झाली आहे.विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शासनाने सर्व शिक्षण ऑनलाईन माध्यमातून करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे शिक्षण दिले जात आहे.

  सध्याची परिस्थिती पाहता बहुतांश पालकवर्ग बेरोजगारीला सामोरा जात असल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे.यामुळे कॉलेज फी मध्ये पन्नास टक्के सूट मिळणे गरजेचे असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.तसेच विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असल्यामुळे इतर उपक्रम हि थांबले आहेत.त्यामुळे या बाबतीतली व इतर अनावश्यक फि कमी करुन विद्यार्थांना आधार देणे हि गरजेचे असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

  तसेच फि अभावी विद्यार्थ्यांना काही शिक्षण संस्था ऑनलाइन शिक्षणातून बाजूला (रिमुव्ह) करत आहेत तर कांही शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना परीक्षेलाच बसू देत नाहीत यामुळे विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे नुकसान होईल त्यामुळे  अशा गोष्टी होवु नयेत याकडे हि  कुलगुरुंनी लक्ष घालावे अशी मागणी केली.

यावेळी युवासेनेचे विस्तारक डॉक्टर सतीश नरसिंग,युवासेना जिल्हाप्रमुख  मंजित माने,युवासेना उपजिल्हाप्रमुख शिवाजी पाटील,संदीप पाटील,राहुल पाटील,  शिवाजी विध्यापीठाचे रजिस्टार विलास नांदवडेकर,मयुर भोसले,सचिन शिंदे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments