शिराळा, ता.२९:शिराळा शहर व परिसरातील कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना विषाणू संसर्ग कमी होऊन रोगाचा प्रसार नियंत्रित रहावा या हेतूने शिराळा नगरपंचायत मार्फत कोरोना टेस्ट तपासणी पथक तयार करण्यात आले. या पथकाद्वारे शहरातील बाजारपेठ परिसर व कोरोना संक्रमित रुग्णांच्या आजूबाजूच्या परिसरातील सुमारे १०० व्यापारी व नागरिकांचीरॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली.
जिल्हाधीकारी यांनी व्हिडीओ काॅन्फरन्सिंग द्वारे बैठक घेऊन याबाबत सूचना दिल्या होत्या.नुसार शिराळा तहसीलदार यांच्या आदेशानुसार ही तपासणी करण्यात आली.
यासाठी नगरपंचायत, महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासन यांचे संयुक्त पथक नेमण्यात आले. या पथकाद्वारे कुरणे गल्ली, सोमवार पेठ, पोटे चौक, मरिमी चौक, मटन मार्केट, या परीसरातील विविध आस्थापनांच्या कर्मचार्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करून घेण्यात आल्या. या तपासणी पथकात नगरपंचायतच्या कार्यालयीन अधीक्षक सुविधा पाटील,लिपिक गणपती इंगवले,संजय इंगवले, तात्यासो कांबळे, विकास कापसे व इतर आरोग्य कर्मचारी, मंडल अधिकारी सागर खैर, तलाठी अभिजित मस्के, शिराळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी बामणे यांचा समावेश आहे.या पथकाद्वारे तपासणी वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पाटील,शिराळा नगरपंचायत चे मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील, पाणीपुरवठा अभियंता श्री. शरदचंद्र पाटील, अभियंता मुनीर लंगरदार, गणपती यादव उपस्थित होते.
0 Comments