BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोरोना काळात प्रा. राजसिंह पाटील यांच्याकडून नेहमीच रुग्णांना व प्रशासनाला मदतीचा हात : डॉ .मनोज महिंद.


 शिराळा,ता.२२: कोरोना काळात  प्रा. राजसिंह पाटील यांच्याकडून रुग्णांना व प्रशासनाला होत असलेली मदत  निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत  वैद्यकीय अधिकारी डॉ .मनोज महिंद यांनी व्यक्त केले प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दररोज कोविड रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात येते. येथील उपजिल्हा रुग्णालयात   प्रा. राजसिंह पाटील यांच्या  वाढदिवसाचा खर्च टाळून पौष्टिक आहार वाटप करण्यात आले. यावेळी डॉ.महिंद म्हणाले , सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या 

प्रा. राजसिंह पाटील यांच्याकडून यावर्षी देखील प्रशासनाला व समाजातील  गरजूंना सहकार्य लाभले आहे.

कार्यक्रमास  मनोज मस्के, प्रताप कदम, विनायक गायकवाड, प्रितम निकम , अजित महाजन , दिनेश हसबनीस , विठ्ठल नलवडे , विकास शहा , विजय गराडे , मनोज मस्के,सचिन पाटील, सुरज कांबळे, महेश पोखलेकर,दिग्विजय शेणेकर, इम्रान अत्तार, अमित चव्हाण उपस्थित होते .



शिराळा: शिराळा तालुक्यातील २८,गडहिंग्लज तालुक्यातील १ अशा एकूण २९ गावात ७६ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,बिऊर,गवळेवाडी,गुढे, कणदूर,करमाळे, खेडमानेवाडी,मांगरूळ,नाटोली,रांजणवाडी,रेड,रेठरे धरण,तडवळे,वाकुर्डे खुर्द,गडहिंग्लज तालुक्यातील बिद्रेवाडी,प्रत्येकी १, भागाईवाडी, जांभळेवाडी, कांदे, विरवाडी प्रत्येकी २,चिखलवाडी,ढोलेवाडी,पाडळी, प्रत्येकी ३, कोकरूड, सागाव,प्रत्येकी ४,रिळे ५,चिखली ६,शिराळा ७,मांगले,वाकुर्डे बुद्रुक प्रत्येकी ९,असे एकूण ७६ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments