BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या चार मार्गावर शिराळा आगाराची एस.टी. सुरू

 


शिराळा,ता. ८: शिराळा आगारातून फक्त सांगली जिल्ह्यातील  प्रमुख मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली असल्याची माहिती आगारप्रमुख विद्या कदम यांनी दिली. एक जून पासून शिराळा आगारातून दुसऱ्या लाटेतील टाळेबंदी नंतर, पहिली बस  शिराळा ते मिरज या मार्गावर सुरू झाली. दररोज एक फेरी असे तिचे स्वरूप होते. आता सात जून पासून आणखी काही प्रमुख मार्गावर शिराळा आगारातून बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

     गेल्यावर्षी आणि याहीवर्षी टाळेबंदीमुळे एसटीच्या वाहतूक सेवेवर वर मोठा परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील प्रमुख दळणवळणाचे साधन म्हणून एसटी म्हणजेच 'लालपरी' ची भूमिका महत्त्वाचे आहे. एसटी सुरू झाल्यास बाकीचे व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येण्यास मदत होते. आता  शासनाच्या टाळेबंदी शिथिलीकरण धोरणानुसार एसटीने प्रमुख मार्गावर बस सेवा सुरू केली आहे.सकाळी साडेसात वाजल्यापासून सायं सहा वाजेपर्यंत शिराळा - सांगली या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.शिराळा ते सांगली शिराळा ते जत,  शिराळा ते इस्लामपूर ,शिराळा ते शेडगेवाडी आणि शिराळा  ते मिरज या मार्गावरील  बससेवा आता सुरू झाली आहे. शिराळा ते सांगली या मार्गावर सकाळी शिराळा येथून सात वाजून 30 मिनिटांनी,  नऊ वाजून 15 मिनिटांनी आणि दुपारी तीन वाजता बस सुटेल. तर शिराळा ते जत  या मार्गावर   सकाळी सात  वाजून    40  मिनिटांनी, शिराळा ते   मिरज  या मार्गावर  सायंकाळी सहा वाजता, शिराळा ते  इस्लामपूर या मार्गावर दुपारी बारा वाजून  २०  मिनिटांनी, दुपारी दोन वाजता , शिराळा ते   शेडगेवाडी  

मार्गावर सकाळी सव्वा दहा आणि दुपारी पावणेचार वाजता, बस सेवा सुरू करण्यात आली आहे . अशा शिराळा आगारातून जिल्हांतर्गत फेर्‍या सुरू करण्यात आले आहेत. याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुख विद्या कदम यांनी केले आहे. लोकांचा प्रतिसाद पाहता आणि शासन नियमानुसार हळूहळू सर्व मार्गांवर बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments