BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रहायला घर नाही; खायला धान्य नाही संसार कसा उभारू

 


शिराळा, ता.९: वादळी वाऱ्याने एक क्षणात होत्याच नव्हत केलं. संसार उपयोगी साहित्य ,धान्य,कपडे भिजल्याने रहायला सुरक्षित जागा नाही .खायला धान्य नाही. त्यामुळे  चव्हाण कुटुंबातील १३ जणांच्यावर  मुलांबाळासह दुसऱ्याच्या घरी आसरा घेण्याची वेळ आल्याने घर पुन्हा कसं उभा करायचं या विवेनचनेत असणाऱ्या कुटुंबाला  हवा आहे मदतीचा हात.

ही व्यथा आहे भटवाडी( ता.शिराळा) येथील वादळात घर गमावलेल्या चव्हाण कुटुंबीयांची.

शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाची सुरवात झाली.पाऊस थांबला पण अचानक शिराळा औद्योगिक वसाहतीमध्ये वादळ निर्माण झाले.त्याच्या मार्गात येणाऱ्या इमारती,घरे,झाडे झुडपे यांना जमीनदोस्त करत वादळ पुढे पुढे सरकत भटवाडी येथील नरसिंह वस्तीत घुसले.त्याठिकाणी प्रकाश विश्वास चव्हाण, विकास विश्वास चव्हाण, दिपक विश्वास चव्हाण यांच्यासहर इतर १० ते १२ घरांचे छप्पर उडाले.यात चव्हाण कुटुंबांच्या घरावरील पत्र्याचे छप्पर उडून गेले.त्यामुळे त्यांचे सर्व संसार उपयोगी साहित्य ,धान्य,कपडे भिजले. आता रहायला सुरक्षित जागा नाही .खायला धान्य नाही. त्यामुळे मुलांबाळासह १३ जणांना दुसऱ्याच्या घरी आसरा घेण्याची वेळ आली आहे.  या कुटुंबाला कोरडवाहू जमीनीमुळे उत्पन्नचे दुसरे साधन नसल्याने शिराळा औद्योगिक वसाहतीत मोलमजुरी करून  उदरनिर्वाह सुरू आहे. त्यांचा हा जगण्याचा संघर्ष नियतीला मान्य नाही. कारण त्यांच्यावर आता आलेले हे संकट तिसऱ्यांदा आले आहे. .या पूर्वी ही त्यांना दोन वेळा पाऊस व वादळी वाऱ्याचा फाटक बसला होता.त्या नुकसानीतुन सावरत असताना आता पुनः मोठा फटका बसला आहे.त्यामुळे मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबाचे आर्थिक दृष्ट्या कंबरडे मोडले आहे. आता हा फाटका संसार कसा उभा करायचा या विवंचनेत ते कुटुंब आहे.त्यासाठी त्यांना  समाजातील  दानशूर लोकांनी मदतीचा हात देण्याची गरज आहे.

 संसार उपयोगी साहित्य व धान्य भिजल्याने  चार दिवस चूल बंद आहे. त्यामुळे चव्हाण कुटुंबातील १३ जणांना गावातील लोक दोन वेळचे जेवण देत आहेत.आसरा नसल्याने शेजाऱ्यांच्या घरीच झोपत आहेत. या कुटुंबाला आधार देत लोकांनी शेजारधर्म पाळला असल्याचे दिसून येत आहे.


 

आम्ही त्यांचा संसार पुनः उभारू

या गरीब कुटुंबाला आथिर्क मदत करण्यासाठी गावातील युवकांनी पुढाकार घेतला आहे.त्या व इतर लोकांच्याकडून मिळणाऱ्या मदतीच्या साहाय्याने या कुटुंबाचा संसार पुन्हा उभा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सरपंच विजय महाडिक यांनी दिली.

Post a Comment

0 Comments