BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सर्वांना सोबत घेऊन चालणारे सहृदयी नेतृत्व-आमदार मानसिंगराव नाईक

सर्वांना बरोबर घेवून चालणारा सहृदयी समाजकारणी असचं आमदार मानसिंगराव नाईक यांना संबोधावे लागले. कारण संपूर्ण जग जेव्हां कोरोना महामारीमुळे आरोग्याबाबत चिंतीत होत तेंव्हापासून हे नेतृत्व मतदार संघातील जनतेच्या सेवेत होत. स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. जनतेच्या मदतीसाठी आहोरात्र धडपडणारे, धावणारे, पायाभूत सोई-सुविधा निर्माण करणारे व सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असणारं हृदयस्पर्शी नेतृत्व म्हणून आमदार मानसिंगराव नाईक (भाऊ) वेगळी ओळख निर्माण केली आहे. हे करत असताना त्यांना मतदार संघातील जनता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब व सर्व नेतेमंडळीसह त्यांना पावलो पावली मदत करणारे राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मा. ना. जयंतराव पाटीलसाहेब यांची भक्कम साथ मिळाली आहे. आज मानसिंगभाऊंचा वाढदिवस यानिमित्ताने त्याच्या कृर्तूत्वाचा घेतलेला आढावा...

सुमारे दीड वर्षाहून अधिक काळ आपण कोरोना महामारीच्या काळाला तोंड देत आहोत. या काळात कोरोना संक्रमणाने अनेक आप्त, स्वकीय, मित्रंमंडळी आपण गमावली आहेत. त्यांच्या कुटूंबियांना धिर देत कित्येक रुग्णांना या संक्रमनातून यशस्वी बाहेर पडण्यासाठी मानसिंगभाऊंनी प्रयत्न केले आहेत. मतदार संघातील जनतेसाठी नियोजनपूर्वक व ठोस वाटचाल केली आहे. आमदार भाऊंनी निर्माण केलेल्या यंत्रणेकडून हजारो लोकांना मदत झाली आहे. मतदार संघातील जनतेच्या आरोग्यहिताला प्राधान्य दिले आहे. सतत संपर्कात राहून जनतेच्या अडी-अडचणी सोडवण्याचा, सोई-सुविध निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे.
आमदार मानसिंगभाऊंनी समाज मनं ओळखून त्यांच्या अडी, अडचणी, प्रश्न व गरजा जाणून त्या सोडविण्यासाठी बांधील आहेत. स्पष्टवक्तेपणा, निवडणूकीपुरते राजकारण व इतर वेळी समाजकारण करणारे ‘मानसिंगभाऊ’ सर्वांना परिचीत आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सहकार, शेती, शेतकरी यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी झटणारे नेतृत्व, अशी ओळख त्यांनी त्यांच्या कामातून निमार्ण केली आहे. प्रसंग, परिस्थिती कोणताही असो, लढायचेच ही त्यांच्या कामाची खास बाब आहे.

कोवीड योध्दा लोकप्रतिनिधी ः
कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढू लागाताच हे नेमके काय संकट आहे. याची माहिती देण्यासाठी संपूर्ण मतदार संघाचा दौरा केला. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे लोकप्रतिनिधी व काही महत्वाचे लोकांना पाचारण करून बैठका घेवून परिस्थिती व कोरोनाचे गांर्भीय पटवून दिले. कोरोना रोखण्याबाबत उपाय योजना, त्यांनी घेतलेल्या खबरदार्‍या, गावाचे नियोजन, ग्रामपंचायत, नगरपंचायतीची कर्तव्य, त्यांच्या जबाबदार्‍या आदींबाबत माहितीची देवाण घेवाण या दौर्‍यातून केली. यामुळे डोंगरावर वसलेल्या वाड्या वस्त्यापर्यंत कोरोना विषाणूची माहिती पोहोचली. विराज इंडस्ट्रिजमध्ये सॅनिटायझरची निर्मिती केली. प्रत्येक ग्रामपंचायतीला ना नफा, ना तोटा या तत्वावर सॅनिटायझारचा पुरवठा केला जात आहे.

योग्य नियोजन करत दिला मदतीचा हात ः

महसूल, पोलिस, आरोग्य, पंचायत समिती आदी अधिकार्‍याच्या बैठका घेवून योग्य प्रकारे नियोजन केले. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उप केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयास भेटी दिल्या. तेथे कोणकोणत्या उणीवा आहेत, कशाची आवश्यक्ता आहे, हे समजावून घेवून त्या सोडवल्या. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आदींना मास्क व फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. संस्था कोरोनटाईन केलेल्या लोकांना चादर व बेडशिट वाटप, नगरपंचायत क्षेत्रातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, अर्धवेळ परिचारिका आदींना शासनाने दिलेला प्रत्येकी एक हजार रुपयांचा प्रात्साहन भत्ता मिळत नाही, म्हटल्यावर त्यांनी लोकनेते फत्तेसिंगराव नाईक ट्रस्ट मार्फत तो देण्याची व्यवस्था केली. दुभत्या मुक्या जनावरांचे चार्‍यासाठी हाल होत असलेली माहिती मिळाल्यावर भाऊंनी क्षणाचाही विचार न करता अनेक गावात विराज पशुखाद्य मोफत वाटप केले.
बंद मुळे अडकून पडलेल्या ऊस तोडणी मजूरांना आवश्यक साहित्यांच्या किटचे वाटप केले. गाव पातळीवरील आवश्यक सेवा कशा सुरू राहतील, शासनाच्या नियमांचे उल्लघंन नागरिकांकडून होणार नाही याची खबरदारी घेतली. वाढदिवसाचा खर्च टाळून मतदार संघातील येणार्‍या सर्व 75 हजार कुटुंबांना अर्सिनिक अल्बम 30 या होमीओपॅथी गोळ्या वाटपाचा केले. शिराळा तालुका ग्रामीण आहे. विशेषतः पश्चिम भागातील नागरिकांची आरोग्याची सोय व्हावी, यासाठी कोकरूड ग्रामीण रूग्णालयात आसोलेशन कक्ष उभारला. शिराळा तालुक्यातील सर्व शाळांना सॅनिटायझर मिशीनचे मोफत वाटप केले.

शासकीय मदत आणि प्रसंगी पदरमोड ः
शिराळा उप जिल्हा रुग्णालयात कोवीड सेंटर सुरू केले. त्याच्यासाठी लागणारी आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध केली. रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता पडू नये म्हणनू ऑक्सीजन 6 टन क्षमतेच्या ऑक्सीजन टाकीची उभारणी केली. कोकरूड ग्रामीण रुग्णालयास जंबो ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करून दिले. शिराळा उप जिल्हा रुग्णालयासाठी 25 ऑक्सीजन बेडसाठीचे सर्व साहित्य पदरमोड करून उपलब्ध करून दिले. कोवीडचा सामना करत असताना त्यांना सर्वोतोपरी मदत राज्याचे जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व सांगली जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. जयंतराव पाटीलसाहेब यांची. मंत्री पाटीलसाहेब यांनी कोवीड काळात अनेकदा शिराळा तालुक्याचे दौरे केले. आमदार मानसिंगभाऊ यांनी मागणी केलेली प्रत्येक गोष्ट मान्य करुन ती उपलब्ध करून दिली. वेळोवेळी मार्गदर्शन केले. या सर्वाचा परिपाक शिराळा मतदार संघात कोविड रुग्ण नियंत्रण मिळवण्यावर झाला. लाखो नागरीकांचा आरोग्य सुरक्षित राहील.

कोवीड रुग्णांसाठी सतत धडपड ः

कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव, त्याची दाहकता, वाढता प्रसार या गोष्टी लक्षात येवूनही कित्येदा अनेक लोकांनी सांगूनही त्यांनी जनतेचा संपर्क तुटू दिला नाही. जनतेसाठी स्वःताचे आरोग्य धोक्यात घातले. ऑक्सीजन बेडची, व्हेंटीलेटर बेडची, रेमडीसिवर व तत्सम इंजेक्शनची उपलब्धता करुन देणे आदी कामासाठी फोन केलेल्या कोणालाही नाराज होऊ दिले नाही.

औद्योगीकरणाचा चेहरा दिला ः

औद्योगिककरणात ‘विश्वास’ व ‘विराज’ उद्योग समुहाने सांगली जिल्ह्यात नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रात गरुडभरारी घेवून अनेक मानांकने प्राप्त केली आहेत. त्यामागे मानसिंगभाऊंचे द्रष्टे व विकासवादी नेतृत्व आहे. उद्योग समुहातील सर्व उद्योग व संस्था यशस्वीपणे चालवून शिराळा सारख्या डोगराळ तालुक्याला औद्योगिकरणाचा चेहरा दिला आहे. सन 2000 पासून सहकाराबरोबर समाजकारण आणि राजकारणात पर्दापण केलेल्या भाऊंनी अल्पावधीत अमुलाग्र बदल घडविले. सहकारात बदलत्या काळानुरूप नविन प्रकल्पांची, संस्थांची यशस्वीपणे उभारणी केली. आज विस्तारलेला ‘विश्वास’ व ‘विराज’ उद्योग समुहाचा परिघ त्याची प्रचिती देतो. सर्वसामान्य जनतेची प्रगती व बेरोजगारांच्या हातास काम हाच एकमेव मुलमंत्र घेवून काम करणार्‍या मानसिंगभाऊंनी संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अनेक प्रकल्पांची यशस्वी उभारणी ः

सहकारातून समृद्धी, उद्योगातून रोजगार निर्मिती, शेतीची सर्वांगिण प्रगती, प्रगत तंज्ञानाच्या वापराने वेळेची बचत, उत्पादन व दर्जात वाढ, शैक्षणिक व सामाजिक विकास हा मूलमंत्र घेवून मानसिंगभाऊंची अत्यंत प्रभावीपणे वाटचाल सुरू आहे. आपला बझार, विराज इंडस्ट्रिज, फत्तेसिंगराव नाईक दूध संघ, विश्वासची डिस्टलरी, वीज निर्मिती प्रकल्प, कंपोस्ट खत प्रकल्प, माती व पाणी परिक्षण प्रयोगशाळा, द्रवरूप जिवाणू खत निर्मिती प्रकल्प, शिराळा कार्बन डाय ऑक्साईड गॅस बॉटलिंग प्रकल्प, ऊस बियाणे निर्मिती प्रकल्प, चिखली गॅसेस, विराज हायटेक विविंग, विराज पशुखाद्य निर्मिती, विराज सॅनिटायझर प्रकल्प, देशी व विदेशी मद्यनिर्मिती प्रकल्प, विराज रिफायनरी या प्रकल्पांची यशस्वीपणे उभारणी केली. सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी काळाची गरज ओळखून कारखाना स्थळावर लोकनेते फत्तेसिंगराव नाईक (अप्पा) गांडूळ खत प्रकल्पाची उभारणी केली आहे.  

सहकारातून समृध्दी ः
आमदार मानसिंगभाऊंनी सहकारातील मुळ संस्था असलेल्या विश्वास कारखान्याचे व्यवस्थापन नेटके ठेवत कारखाना आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या सक्षम केला. कर्मचारी पगारवाढ, प्रत्येक वर्षी बोनस, सभासदांना अल्पदरात साखर, रुग्णवाहिका व अग्निशामक टँकर, ठिबक सिंचन अनुदान योजना, कामगार विमा योजना आदी सोई-सुविधा निर्माण केल्या. शेती आणि शेतकर्‍यांच्या विकासासाठी कारखान्यामार्फत विविध योजना राबवीत सोयी, सवलती देऊ केल्या आहेत. कारखान्यामार्फत राबविण्यात आलेल्या विविध पाणी योजनांना शासनाकडून कर्जमाफी मिळवून बहुतांशी शेतकरी कर्जमुक्त केला. आता ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीचा संकल्प केला आहे. अल्पवधीत इथेनॉल निर्मिती होईल.

समाजकारणाला प्राधान्य ः

सन 2000 साली विश्वास कारखान्याची सूत्रे हाती घेतल्यापासून सामाजिक उपक्रमात मानसिंगभाऊंचा सहभाग कायम आहे. औद्योगिक प्रगती झाल्याशिवाय बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही. पाणी मिळाल्याशिवाय शेती पिकणार नाही. 80 टक्के शेतकरी असलेली जनता विशेषतः महिलांच्याही प्रगतीसाठी शेतीपूरक व्यवसायांना चालना देणे महत्वाचे आहे. शिवाय बचत गटांच्या माध्यमातून संघटीत असलेल्या महिलांनी विविध छोटे, मोठे उद्योग, व्यवसायात यायला हवे यासाठी ते प्रशत्नशील आहेत. फत्तेसिंगराव नाईक इंडोमंट ट्रस्टच्या माध्यमातून दुर्धर आजारावरील शस्त्रकियांसाठी आर्थिक मदत, कुपनलिका (बोअर), आरेाग्य शिबिरे, पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यानां मोफत वही वाटप, शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व परीक्षा, पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृती योजना, रक्तदान, पत्रकार विमा योजना, कुमार-युवा साहित्य संमेलन, किर्तन महोत्सव, खेळ पैठणीचा, मंगळागौरी स्पर्धा, स्वातंत्र्य सेनानी आनंदराव नाईक विशेष गुणवत्ता पुरस्कार, होम मिनिस्टर, कृषी प्रदर्शन आदी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. 2019 ला आलेल्या वारणा नदीस पूर आल्यानंतर 3000 कुटुंबाना अत्यावश्यक साहित्यांचे किट वाटप केले. तसेच जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक गावात मोफत विराज पशुखाद्याचा पूरवठा केला. दरवर्षी विश्वास व विराज उद्योग समुहातील कर्मचारी आरोग्य तपासणी शिबीर घेतले जाते.

सक्षम लोकप्रतिनिधी

2009 ते 2014 व 2019 पासून आज मितीपर्यंत असा आमदार मानसिंगभाऊंचा कार्यकाल. 2009 ला ते पहिल्यांदा आमदार झाले. या कालावधीत त्यांनी ज्या गतीने शिराळा मतदार संघाचा विकास केला, असा विकास यापूर्वी जनतेने कधीच पाहिला नव्हाता. सभागृह, काँक्रीट रस्ते, नाले, पाणंद रस्ते, पिण्याच्या पाणी योजना, कुपनलिका, पाइप लाईन, ग्रामपंचायत कार्यालय इमारती, ग्रामसचिवालय इमारतींची कामे मार्गी लावली. तिर्थक्षेत्र विकास, पर्यटन विकास, शिराळ्यातील टोलेजंग मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पंचायत समिती इमारत, सर्व सोई नियुक्त आय.टी.आय मध्ये विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह, अत्यंत देखणी शिराळ्यातील बस स्थानक इमारत, शिराळा येथे 50 खाटांचे उप जिल्हा रुग्णालय इमारत, बिळाशी, येळापूर, पाचगणी व चिकुर्डे, वाटेगाव येथे नविन प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजूरी, पाचगणी, खराळे, चिंचेवाडी व जाक्राईवाडी येथे आरोग्य उप केंद्रास मंजूरी आणली. शिराळा औद्योगिक वसाहत, कणदूर, बिळाशी व करंजवडे येथील वीज केंद्र, शिराळा शहराचा पर्यटन विकास, वाकुर्डे बुद्रूक योजनेस निधी मिळवून वारणेचे पाणी उत्तर भागातील वाकुर्डे तलावात आणले. उत्तर भागातील जनतेची गिरजवडे प्रकल्पाची अनेक वर्षापासूनची मागणी पूर्णी केली. शिराळा विधानसभा मतदार संघात कधी नव्हे एवढा 517 कोटी रुपयांचा विकास निधी त्यांनी शासन दरबारी प्रयत्न करून खेचून आणला.

पुन्हा विकास कामांचा धडाका
2019 च्या विधानसभेला मतदार संघातील जनतेने पुन्हा मानसिंगभाऊंच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. जबाबदारी घेताच मार्च 2020 मध्ये कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगावर आले. सर्वसामान्यांचे जनजिवन विस्कळीत झाले, ते आजमितीस पूर्वपदावर आलेले नाही. असे असतानाही आमदार मानसिंगभाऊं यांनी मतदार संघातील विकासात सातत्य ठेवले आहे.
शिराळ्याच्या विकासासाठी इतिहासात प्रथमच एकावेळी 5 कोटी दिले. आणखी 5 कोटी मंजूूर केले आहेत. जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटीलसाहेब यांच्या सहकार्याने चांदोली धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. विनोबाग्राम व धनगरवाडा येथील वन विभागाच्या नावावर असलेल्या शेतजमीनीबाबत निर्णय केला आहे. चांदोलीचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास साधण्यासाठी ठोस प्रयत्न केले जात आहेत. चांदोली राष्ट्रीय उद्यानात पर्यटाकंसाठी जंगल सफारी मार्ग सुरू केले आहेत. शिराळा येथील तोरणा भूईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळ्यास त्यांच्या जिवनावर प्रकाश टाकणारी चित्रसृष्टी उभारण्याचे काम मंजूरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
 फक्त दोन वर्षातील ठळक कामांचा लेखाजोखा आपणास खुप कांही सांगेल ः
अर्थ संकल्पातील कामे (2020-2021) ः वारणा प्रकल्प ः 200 कोटी. वाकुर्डे बुद्रूक योजना ः 200 कोटी. वाळवा ते वाकुर्डे खुर्द रस्ता सुधारण ः 290.92 कोटी. रस्ते व पूलांची कामे ः 66.31 कोटी.
रस्ते व पुलाची कामे ः 45 कोटी. गावार्तंगत मुलभूत सोई-सुविधा कामे ः 15 कोटी. शिराळा नगरपंचायत क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान ः 5 कोटी व आणखीन 7.60 कोटी मंजूर केले आहेत. वाळवा तालुका पुलाची कामे ः 4.61 कोटी. स्थानिक विकास निधी ः 4 कोटी, कुंडलवाडी-चावरे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा ः 4.09 कोटी. मांगले येथे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा ः 3.62 कोटी. सार्वजनिक बांधकाम उप विभाग कार्यालय शिराळा इमारत बांधकाम ः 2.04 कोटी. पूर संरक्षक कामे ः 34 लाख. मौजे पेठ येथे शादीखाना बांधकाम ः 25 लाख. शिरशी व शेडगेवाडी येथे सी.एस.सी. सेंटरसाठी इमारत ः 10 लाख. पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्र - 3 कोटी. बिळाशी प्राथमिक आरोग्य केंद्र - 3 कोटी (दोनही इमारती पूर्ण). जिल्हा वार्षिक योजन मतदार संघासाठी 3.60 कोटी. येळापूर प्राथमिक आरोग्य केंद्र - 4.10 कोटी. सागाव प्राथमिक आरोग्य केंद्र - 3.50 कोटी. शिराळा तालुक्यातील पशुवैद्यकीय इमारत बांधकामासाठी संरक्षक भिंत ः 1.28 कोटी. डोंगरी विकास निधी ः 80 लाख. साकव योजनेतून इंग्रुळ (40 लाख) वाडीभागाई (20 लाख), मृद व जलसंधारण मधून शिंटेवाडी व चिखलवाडी येथे दोन बंधार्‍यासाठी 2 कोटी.
(एकूण ः 786.78 कोटी रूपये)

मजबूत पक्ष संघटन ः
शिराळा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे. कार्यकर्त्याशी जवळीक व सतत संपर्क हे त्याचे मुख्य कारण आहे. सर्वांच्या सुख, दुःखात, आनंदात, सभा, समारंभात मानसिंगभाऊंना निरोप पोहोचला आणि ते आले नाहीत, असे नाही. वेळात वेळ काढून उपस्थिती लावतातचं. यामुळेच मतदार संघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, ग्रामपंचायती, सोसायट्या, नगरपंचायत आदी ठिकाणी मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने विरोधकांना पराभवाची धुळ चारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतदार संघातील जनतेचा प्रथम क्रमांकाच्या पसंतीचा व सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आहे. वेळोवेळी पक्षाने तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर केलेल्या अनेक आंदोलनात, मोर्चात, समारंभात मानसिंगभाऊंचा सक्रीय सहभाग राहीला आहे. मतदार संघातील जनतेने दिलेले प्रेम, दाखविलेला विश्वास व जिव्हाळा कायम आहे.

लोकनेत्याचे स्मरण ः
शिराळा विधानसभा मतदार संघ व शाहुवाडी तालुक्यातील जनकल्यानासाठी अविरत प्रयत्न करणारे भाग्यविधाते लोकनेते फत्तेसिंगराव नाईक (अप्पा) यांच्या समृती चिरंतन जतन करण्यासाठी विश्वास कारखाना स्थळावर पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी केली आहे. त्याचे आनावरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात स्व. अप्पांच्या कार्याचा गौरव सर्व मान्यवरांनी केला. विशेष करून त्यांचा वारसा चालवणार्‍या आमदार मानसिंगभाऊंचे कार्य, कार्यशैली, मतदार संघातील जनतेसाठी धडपड, विकासाचा दृष्टीकोन व त्यामागची तळमळ प्रर्कषाने अधोरेखीत केली. यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे खूप कांही सांगून गेली. त्यामुळे मानसिंगभाऊंनी लोकनेते फत्तेसिंगअप्पांचा समाजकारणाचा वसा व वारसा सक्षमपणे व दुरदृष्टीने चावला आहेत, असेच म्हणावे लागेल.



म्हणून मतदार संघातील जनतेचे मानसिगभाऊंच्यावर प्रेम कायम आहे.
आमदार मानसिंगभाऊंचे भेटने. आपुलकीने विचारपूस करणे. सुख, दुःखात सहभागी होऊन व संकटकाळी मदत करणे, ही कृती सर्वसामान्यांच्या मनात घर करते. निवडणूकीपुरते राजकारण मर्यादित ठेवून इतर वेळी मतदार संघातील सर्व जनतेला आपलं कुटुंब माननारा एक दृष्टा लोकप्रतिनिधी असे मानसिंगभाऊंना म्हणावे लागेल. समाजाप्रती तुमच्या मनात असलेला भावना व ओढ अशीच कायम राहू दे. तुम्हची समाजमनावरची छाप कोनीही कितीही प्रयत्न केलेतरी त्यांना ती पुसता येणार नाही. याच तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

शब्दांकन : संतोषकुमार भालेकर (प्रसिद्धी अधिकारी, विश्वास साखर)

 

नाव ः मानसिंग फत्तेसिंगराव नाईक
जन्म ः 26 जून
पत्ता ः मु. पो. चिखली, ता. शिराळा, जि. सांगली.
दूरध्वनी ः (02345) 272143, 231001
भ्रमणध्वनी ः 9822172222
वडिलांचे नाव ः लोकनेते स्व. फत्तेसिंगराव आनंदराव नाईक
पत्नी ः सौ. सुनिता मानसिंग नाईक
मुले ः सौ. शर्मिला राजेंद्र लाड
सौ. मोनालिसा मानसिंग शिंदे
सौ. पल्लवी विक्रमसिंह पाचपुते
श्री. विराज मानसिंग नाईक
सून ः सौ. डॉ. शिमोनी विराज नाईक
आवड ः व्हॉलीबॉल खेळणे, सांस्कृतिक, सामाजिक व सार्वजनिक विकास,
        शैक्षणिक, पाणी, शेती व औद्योगिक प्रगतीची आवड.
पदे ः
विधानसभा सदस्य : शिराळा मतदार संघ 2009 ते 2014 व 2019 पासून कायम)
चेअरमन ः सन 2000 पासून विश्वासराव नाईक सह. साखर कारखाना, चिखली.
अध्यक्ष व कार्यकारी संचालक ः विराज अल्कोहोल अँड अलाईड इंडस्ट्रिज लि., शिराळा.
संचालक ः सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि; सांगली.
चेअरमन ः विराज अ‍ॅग्रो बायोशुगर लि., शिराळा.
प्रदेश प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र.
संस्थापक ः आपला बझार, शिराळा.
संस्थापक ः विराज हायटेक विव्हिंग प्रा. लि., शिराळा.
  ..................................................
  
द़ृष्टीक्षेपातील विकास

1)शिराळा, वाळवा तालुक्यासाठीची महत्वाकांक्षी वाकुर्डे बुद्रूक पाणी योजना पूर्णत्वास नेणे.
2)शिराळा येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारणे.
3)विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गाव पिण्याचे व शेतीच्या पाण्यासाठी स्वयंपूर्ण करणे.
4)चांदोली राष्ट्रीय उद्यानात व्याघ्र प्रकल्प पूर्णत्वाकडे नेणे.
5)चांदोली परिसराचा पर्यटन दृष्ट्या विकास साधणे व रोजगार निर्मिती करणे.
6)गुढे व पाचगणी पठार थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करणे.
7)स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्यक्तीमत्व विकास केंद्र उभारणी.
8)शिराळा औद्योगिक वसाहतीचा विकासाबरोबर रोजगार निर्मिती करणे.
9)शेती प्रगतीसाठी अत्याधुनिक माहिती व मार्गदर्शन करणार्या केंद्राची निर्मिती करणे.
10)विविध खेळांचे मार्गदर्शन देणारे क्रिडा संकुल उभारणे.
11)मतदार संघातील शैक्षणिक व आरोग्याच्या सुविधा सक्षम करणे.
12)चांदोली धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविणे.
  ..................................................
  
कोरोना काळात केलेल्या ठोस उपाय योजना ः
1) मतदार संघातील सर्व गावात दौरा करून जनजागृती करून नियोजन.
2) शासकीय पातळीवर काटेकोर नियोजन.
3) संपूर्ण मतदार संघातील कुटुंबाना (75 हजार) अर्सेनिक अल्बम-30 गोळ्यांचे वाटप.
4) गावोगावी विलगीकरण कक्षाची निर्मिती.
5) शाळकरी मुलांची आगावू काळजी म्हणून प्रत्येक शाळांना सॅनिटायझर मशिनचे मोफत वाटप.
6) कोविड रुग्णांसाठी बेडशिट व चादरींचे मोफत वाटप.
7) आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका आदी कर्मचार्‍यांना फेस शिल्डचे वाटप.
8) कोकरूड ग्रामीण रुग्णालय व शिराळा उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटरची उभारणी.
9) शिराळा उप जिल्हा रुग्णालयात 6 टन क्षमतेचा ऑक्सीजन टँकची उभारणी.
10)कोकरूड ग्रामीण रुग्णालयासाठी जंबो ऑक्सीजन सिलिंडर व्यवस्था.
11)शिराळा उप जिल्हा रुग्णालय व वाटेगाव प्रा. आ. केंद्रात पद भरतीस मंजूरी.
12)विराज इंडस्ट्रिजमध्ये सॉनिटायझर निर्मिती प्रकल्प सुरू करून मतदार संघातील सर्व
ग्रामपंचायतींना सवलतीच्या दरात सॅनिटयाझर पुरविले.
13)शिराळा उप जिल्हा रुग्णायातील ऑक्सीजन बेडची संख्या 50 वरून 100 केली.
त्यापैकी 25 बेडसाठी लागणारे साहित्य स्व खर्चाने दिले.
14)बिळाशी प्रथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची उभारणी पूर्ण.
15)येळापूर प्रथमिक आरोग्य आरोग्य केंद्राच्या इमारतीस 4 कोटी रुपये मंजूर.
16)सागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी 3.50 कोटी रुपये मंजूर.
17)पाचगणी आरोग्य केंद्राची इमारत पूर्ण.
18)चिकुर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड सेंटर सुरू केले.
19)शिराळा उप जिल्हा रुग्णालयास स्थानिक विकास निधीतून अत्याधुनिक रुग्णवाहिका प्रदान.

Post a Comment

0 Comments