शिराळा: विध्यार्थी फी माफी संदर्भात पावसाळी अधिवेशनात प्रश्न मांडून सकारात्मक निर्णय घेऊ असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली (ता.शिराळा ) येथे संयुक्त विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने माफीसाठी संदर्भात आमदार नाईक यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी नाईक बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव ऋषिकेश महिंद , सांगली जिल्हा अभियांत्रिकी कार्याध्यक्ष शुभम खांडेकर, शिराळा तालुका अभियांत्रिकी उपाध्यक्ष जयदीप पाटील, महासचिव सत्यम वरेकर, कार्याध्यक्ष यश वनारे, संपर्क प्रमुख आकाश वरेकर , सहसंघट निलेश पाटील तसेच तालुका विज्ञान शाखा कार्याध्यक्ष अभय पाटील, सचिव प्रथमेश पाटील, संघटक ओंकार पाटील, अशितोष पाटील उपस्थित होते..
0 Comments