शिराळा,ता.७: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिऊर (ता.शिराळा) येथील शंकर दौलू पाटील यांनी आपली ४२ वर्षाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून अपरा एकादशी निमित्त महाप्रसाद टाळून त्या ऐवजी शिराळा येथे उपचार घेत असलेल्या कोविड रुग्ण व त्यांच्यासाठी आरोग्य सेवा पुरवणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी आणि निराधारांना सफरचंद वाटप केले.
प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्तिक मुल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, आय.टी. आय कॉलेज, उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी मोफत आहार देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या निमित्ताने या उपक्रमात सहभागी होऊन पाटील यांनी आहार वाटप केले.
यावेळी डॉ. अनिरुद्ध काकडे, डॉ.योगिता माने,डॉ.गायत्री यमगर, डॉ.ऐश्वर्या मोरे, डॉ. जयदीप नलवडे, सुमित पाटील, आकाश पाटील, दिनेश हसबनीस, विनायक गायकवाड, शिवाजीराव चौगुले, प्रताप कदम अजित महाजन, प्रीतम निकम, विजय गराडे, मनोज मस्के,विठ्ठल नलवडे,विकास शहा ,सचिन पाटील,शशिकांत कांबळे, जीवन रणदिवे,सलीम मेहत्तर, आनंदा कांबळे, अविनाश कांबळे, विशाखा सवाईराम,वैशाली सिस्टर, अश्विनी सिस्टर उपस्थित होते.
0 Comments