अंत्री खुर्द (ता.शिराळा) येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले असून बिबट्याच्या तावडीतून कुत्र्याची सुटका करण्यात आली.
याबाबत घटनास्थळा वरून समजलेली माहिती अशी, येथील चौगुले वस्तीवर संजय चौगुले आपली जनावरे चरण्यासाठी घेवून ओढ्याकाठी गेले होते.त्यावेळी सोबत असणाऱ्या कुत्र्यावर अचानक पाठीमागून येऊन बिबट्याने झडप घातली.त्यावेळी संजय चौगुले यांनी व इतर लोकांनी आरडाओरडा करून त्यास हुसकावून लावून कुत्र्याची सुटका करून घेतली. त्यानंतर बिबट्या जवळ असणाऱ्या बंधाऱ्यावर जाऊन निवांत बसला होता. यापूर्वी ही याच परिसरात दोन वेळा लोकांना रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले होते.आज पुन्हा बिबटया दिसल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
0 Comments