BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

एकमेकांना धीर दिला तर कोरोनावर सहज मात करू-कृष्णात नलवडे


 शिराळा, ता.१२:कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी माणुसकीच्या भावनेतून एकत्रित येऊन कोविड बांधवांना धीर दिला तर कोरोनावर सहज मात करू शकतो असे प्रतिपादन  नगरपंचायतचे पाणी पुरवठा पर्यवेक्षक कृष्णात नलवडे यांनी केले. 

प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आय.टी. आय कॉलेज व  उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी दररोज मोफत आहार वाटप उपक्रम सुरू  आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकी म्हणून नायकलवाडी ता.वाळवा येथील सचिन संभाजी कचरे यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या आहार वाटप प्रसंगी बोलत होते.यावेळी सलीम मेहत्तर ,आबासो सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळ दिनेश हसबनीस,विनायक गायकवाड, शिवाजीराव चौगुले, प्रताप कदम, अजित महाजन, प्रीतम निकम, सचिन पाटील, विजय गराडे, मनोज मस्के,विठ्ठल नलवडे,विकास शहा उपस्थित होते. 

शिराळा: शिराळा तालुक्यातील २९,कोल्हापूर ,धुळे,जिल्ह्यातील प्रत्येकी १,अशा एकूण ३१,गावात ८४ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,बेलदारवाडी, चिखलवाडी,देववाडी,करुंगली,माळेवाडी,पाडळेवाडी,विरवाडी, वाकुर्डे बुद्रुक,वाकुर्डे खुर्द,कोल्हापूर,प्रत्येकी १,धामवडे, इंगरुळ,चिखली,कणदूर,खुजगाव,कोकरूड,मांगरूळ, पाडळी, पणुंब्रे वारुण, तडवळे, उपवळे,प्रत्येकी २,धुळे,नाटोली,शिराळा,प्रत्येकी ३,अंत्री बुद्रुक,भाटशिरगाव, बिऊर,प्रत्येकी ४,जांभळेवाडी ५,कांदे ७,टाकवे ८,मांगले ११,असे एकूण ८४ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments