BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम केल्यास सामाजिक सलोखा टिकण्यास मदत होईल-संजय पाटील


 शिराळा: शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील कोविड रुग्णांना डॉ.स्वप्नील मगदूम यांच्याकडे आहार वाटप करताना शिराळा तालुका मनसे अध्यक्ष संजय पाटील सोबत आकाश पाटील,विठ्ठल नलवडे, शिवाजीराव चौगुले

शिराळा,ता.७:जिथं कमी तिथं आम्ही या विचाराने मनसेची वाटचाल सुरू आहे. या सामाजिक बांधीलकीतून मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सामाजिक उपक्रम राबवत आहोत.रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम केल्यास सामाजिक सलोखा कायम टिकण्यास मदत होईल असे प्रतिपादन शिराळा तालुका मनसे अध्यक्ष संजय पाटील यांनी केले.

 प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्तिक मुल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, आय.टी. आय कॉलेज, उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी मोफत आहार देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या निमित्ताने  शिराळा तालुका मनसेने या उपक्रमात सहभागी होऊन शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त  सांगली जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वराज्य फाऊंडेशन  बिळाशी यांच्यावतीने डॉ.एन.के.पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आहाराचे वाटप करण्यात आले.

 यावेळी डॉ. स्वप्नील मगदूम, डॉ.ऐश्वर्या मोरे, डॉ. जयदीप नलवडे, आकाश पाटील विठ्ठल नलवडे, शिवाजीराव चौगुले, दिनेश हसबनीस, विनायक गायकवाड,  प्रताप कदम, अजित महाजन, प्रीतम निकम, विजय गराडे, मनोज मस्के,विकास शहा ,सचिन पाटील,पांडुरंग पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments