मांगले येथील सामाजिक कार्यकर्ते व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रा. दिपक तडाखे यांच्या वाढदिवसानिमित्त होणारा अनाठायी खर्च टाळून आशा वर्कर्स व ग्रामपंचायत कर्मचारी यांना जेवणाचा डब्बा, मास्क, सॅनिटायझ तसेच वार्ड क्रमांक दोन मधील दोनशे कुटूंबांना सॅनिटायझ व मस्कचे वाटप करण्यात आले.
अलीकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा खूप मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने खूप मोठा खर्चही केला जातो. परंतु, मांगले (ता. शिराळा) येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. दिपक तडाखे सर यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी बोलताना प्रा. दिपक तडाखे म्हणाले, वाढदिवस साजरा करताना नागरिक विनाकारण अवाढव्य खर्च करत असतात. हा अनावश्यक खर्च टाळून आपण समाजासाठी काही तरी देणे असते. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत फ्रंट वर्कर म्हणून काम करणाऱ्या आशा वर्कर्स यांनी स्वतःची व कुटुंबाची परवा न करता फार मोठे योगदान दिलेले आहे. शासनाकडून त्यांना अल्प मानधन मिळते तरी देखील सामाजिक भावनेतून आणि जबाबदारीतून अत्यंत चांगल्या रीतीने आपली जबाबदारी सांभाळत असतात.
0 Comments