चिखली (ता. शिराळा) येथे आज विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मचार्यांचे आरोग्य तपासणी शिबिर सुरू झाले. त्याचे उद्घाटन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाले. 23 व 24 असे दोन दिवस शिबीर सुरू राहणार आहे. शिबिरात विश्वास कारखान्यातील सर्व कर्मचार्यांची इ.सी.जी, क्युरेटीन, शुगर व लिपीड प्रोफाईल या तपासण्या होतील. उद्घाटन प्रसंगी कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव सचिन पाटील, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कामगार संघटना उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजयराव देशमुख, कारखान्याचे वैद्याकिय अधिकारी विक्रमसिंंह गावडे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. शिराबीरात इस्लामपूर मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल व के. पी. सी. मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल कोल्हापूर यांच्या डॉ. कपिल घोरपडे, सी.ई.ओ. सागर पाटील, डॉ. अमन पाटील, डॉ. अर्चना बोरकर, डॉ. पार्थ देसाई, डॉ. निलम जाधव, डॉ. स्वप्नील चव्हाण व त्यांच्या स्टाफने तपासणीचे कामकाज पाहिले.
0 Comments