अंजली कांबळे (तांदुळवाडी): वाळवा तालुक्यात झालेल्या जबरी चोरी , मोटारसायकल चोरी तसेच स्थानीक बाजारातून गर्दीचा फायदा घेत महागडे मोबाईल चोरीतील अट्टल गुन्हेगार मगर अशोक काळे ( वय २१ ) रा . येवलेवाडी , ता . वाळवा , यास केदारवाडी ते कासेगाव दरम्यान देसाई मळा येथे सापळा लावुन स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले.
या बाबत अधिक माहिती अशी, वाळवा तालुक्यातील आष्टा , इस्लामपूर , कासेगाव , नागांव , बावची या गावातून जबरी चोरी व मोटारसायकल तसेच मोबाईल चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या . हे चोरटे पकडणेसाठी अनेक वेळा पोलीसांनी सापळा लावला पण सतत चोरांनी गुंगारा दिला होता . ही बाब सांगली जिल्ह्या पोलीस प्रमुख दिक्षीत गेडाम व अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबूले यांच्या लक्षात येताच त्यांनी सदरची केस स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्याकडे सोपवली . गायकवाड यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस तसेच पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे यांच्याकडे वग॔ करताच त्यानी काही पथके तयार केली. त्यापैकी एक पथक पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलींग करत असताना पोलिस .काॅ. सुनिल चौधरी यांना गोपनीय माहीती द्वारे इस्लामपूर हद्दितील बाजारात चोरलेले मोबाईल व घरफोडीतील सोने घेवून दोन इसम विक्री करणेस येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळताच केदारवाडी ते कासेगाव दरम्यानच्या देसाई मळा येथे सापळा लावला असता दोन संशयित इसम मोटारसायकलीवरून येताना दिसताच त्यांच्या हालचाली संशयी वाटू लागल्याने त्यांना ताब्यात घेण्यास जात असता पोलीसांची चाहूल लागताच दोन्ही मोटारसायकली तिथेच टाकून ते दोन्ही इसम पळून जावू लागले . त्यांचा पाठलाग करून एकाला सिताफीने ताब्यात घेतले . पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे यांनी त्याचे नाव विचरले असता मगर अशोक काळे . रा . येवलेवाडी . तालुका . वाळवा असे सांगितले त्यांच्या दोन्ही गाडीला लावलेली पिशवीची झडती घेत असता त्या मध्ये सोन्याचे मणी मंगळसुत्र , सोन्याची दोन लहान अंगठी , नेकलेस , सोन्याची पिवळ्या धातूची अंगठी व वेगवेगळ्या कंपनीचे महागडे एकून ९ महागडे मोबाईल तसेच ताकारी व इस्लामपूर येथून चोरलेल्या दोन मोटारसायकली असा एकून २ ,८१ , २९३ रूपयाचा मुद्दे माल व आरोपी ताब्यात घेणेस स्थानीक गुन्हे अन्वेषण सांगली यांना यश आले आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड , सहाय्यक पो .निरीक्षण रविराज फडणीस , पो . उपनिरीक्षक दिलीप ढेरे , पो . उपनिरीक्षक अभिजीत सावंत , ए .एस .आय मारुती साळुंखे , सुनील चौधरी , गजानन घस्ते , जितेंद्र जाधव , अजय बेंद्रे , बजरंग शिरतोडे कॅप्टन गुंडवाडे आदि कम॔चारी यांनी आपली कामगीरी चोखपणे बजावली सदरचा गुन्हा आष्टा पोलीस स्टेशनकडे वग॔ केला असुन अधिक तपास पो . हे . काॅ . संदेश यादव व पो . हे . काॅ . अभिजीत धनगर करत आहेत.
0 Comments