शिराळा, ता.५: कोरोनाच्या संकटावर मात करण्यासठी सामूहिक एकजूट उभी करण्याची गरज आहे. या सामूहिक एकजूटीच्या जोरावर आपण कोरोनाला हरवू शकतो. कोविड रुग्णांनचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांना सर्वांनी आपुलकीची साथ देऊ असे प्रतिपादन मनसे शिराळा शहर प्रमुख अविनाश खोत यांनी केले.
प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आय.टी. आय कॉलेज व उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी दररोज मोफत आहार वाटप उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने मनसे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक बांधिलकी म्हणून शिराळा तालुका मनसेच्यावतीने कोविड रुग्णांना मोफत आहार वाटप केले. त्या प्रसंगी बोलत होते. मनसेच्यावतीने कोकरूड ग्रामीण रुग्णालय, कोकरूड पोलीस ठाणे, शिराळा येथील स्वस्तिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, आय.टी. आय.व उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी अंडी वाटप करण्यात आले.
शिराळा येथे डॉ.जयदीप नलवडे,डॉ.ऐश्वर्या मोरे, नेत्र चिकित्सक अधिकारी सविता नलवडे,मनसेचे शिराळा तालुका अध्यक्ष संजय पाटील ,अमर सावंत . अविनाश खोत राहुल पाटील . अशोक वनारे . तानाजी थोरात आकाश पाटील गणेश शेळके,सुनिल मिरजकर,स्नेहल मिरजकर,राहुल पाटील, जगनाथ कारंडे,आकाश पाटील,अमर सावंत, ,रवींद्र कारंडे,अक्षय कोळेकर,सुनिल निकम,जीवनकुमार रणदिवे, शशिकांत कांबळे, दिनेश हसबनीस,विनायक गायकवाड, शिवाजीराव चौगुले, प्रताप कदम, अजित महाजन, प्रीतम निकम, सचिन पाटील, विजय गराडे, मनोज मस्के,विठ्ठल नलवडे,विकास शहा उपस्थित होते.
0 Comments