शिराळा, ता.१७:कोरोनाच्या रुग्णांना औषध व आहारा एवढीच मानसिक आधाराची गरज असते. या आधारासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे असे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांनी केले.
प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वरीष्ठउपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी दररोज मोफत आहार वाटप उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकी म्हणून डॉ.प्रवीण पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोविड रुग्णांना आहार वाटप केले.
यावेळी डॉ. मयुरी राजमाने,विस्तार अधिकारी दीपक चिलवंत, संजय चौगुले, लिपिक बी.जी.पाटील, वरीष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक जयंत काळे, नेत्र चिकित्सक अधिकारी सविता नलवडे,,अविनाश पाटील, धनाजी शिंदे, ,शशिकांत कांबळे, दिनेश हसबनीस,विनायक गायकवाड, शिवाजीराव चौगुले, प्रताप कदम, अजित महाजन, प्रीतम निकम, सचिन पाटील, विजय गराडे, मनोज मस्के,विठ्ठल नलवडे,विकास शहा उपस्थित होते.
0 Comments