BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण


 शिराळा, ता.२०: एक सामाजिक बांधिलकी म्हणून शिराळा येथील शिव भोजनालयाच्यावतीने शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोविड रुग्णांना मोफत पौष्टीक आहार वाटप करण्यात आला.

प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी दररोज मोफत आहार वाटप उपक्रम सुरू  आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकी म्हणून शिव भोजनालय यांच्यातीने कोविड रुग्णांना आहार वाटप केले.

यावेळी डॉ. स्वप्नील मगदूम,वैशाली पवार,सुनीता फाळके,अर्जुन नांगरे, राजाराम सुतार,अमित मिरजकर,सचिन पाटील, प्रताप कदम,  दिनेश हसबनीस,विठ्ठल नलवडे, विनायक गायकवाड, शिवाजीराव चौगुले, अजित महाजन, प्रीतम निकम, विजय गराडे, मनोज मस्के,विकास शहा उपस्थित होते. 

शिराळा: शिराळा तालुक्यातील १९ गावात ५१ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव् आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,बांबवडे, भागाईवाडी, भाटशिरगाव, चिखली, देववाडी, कोकरूड,मानकरवाडी, रिळे, तडवळे, शिंदेवाडी  प्रत्येकी १,अंत्री बुद्रुक,कांदे,कणदूर,नाटोली,प्रत्येकी २,चव्हाणवाडी,मांगरूळ प्रत्येकी ३,शिराळा ५,सागाव ६,मांगले १६,असे एकूण ५१ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments