BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कॉंग्रेसचा गाव तिथे शाखा काढण्याचा निर्णय


शिराळा,ता.२८: शिराळा तालुका काँग्रेस कमिटीची मासिक बैठक चिंचोली ता.शिराळा येथील बुद्ध विहारात संपन्न झाली.यावेळी पक्षाकडून आलेल्या निर्देशाप्रमाणे covid-19 रुग्ण व त्यांचे कुटुंबीय बाबत माहिती, कोरोणामुळे मृत व्यक्ती, गमावलेल्या नोकऱ्या व्यवसाय धंद्याची झालेली वाताहत व इतर माहिती संकलन करण्यासाठी दहा कोरोना योद्ध्यांची निवड करण्यात आली.

     यावेळी गावागावातील स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी गाव तिथे शाखा हा कार्यक्रम राबवण्याचे व लॉक डाऊनमुळे उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या पंचवीस शाखांचे येत्या पंधरा दिवसात उद्घाटन करण्याचे निश्चित करण्यात आले.

   यावेळी चरण शाखेचे अध्यक्ष म्हणून निलेश वाघमारे, उपाध्यक्ष म्हणून संजय रामचंद्र नायकवडी, सचिव म्हणून संतोष कुंभार यांना नियुक्तीपत्रे तालुका काँग्रेस अध्यक्ष ॲड. रवि पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

   येलूरचे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते गोविंदराव जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

    यावेळी संघटक तुकाराम चव्हाण, उपाध्यक्ष पोपटराव कदम, सरचिटणीस राजाभाऊ कुलकर्णी, संजय नायकवडी, सुनील घोलप,विकास साळुंखे,शंकर इंगळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments